शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 22:15 IST

सायंकाळी ६:२० वाजता बिरसा मुंडा विमानतळावर (रांची) उतरणारे हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतच सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यामुळे विमानामधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती.

दिल्लीहून रांचीकडे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे (AI 9695) विमान उड्डाण होताच तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा दिल्लीला परतले. सायंकाळी ६:२० वाजता बिरसा मुंडा विमानतळावर (रांची) उतरणारे हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतच सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यामुळे विमानामधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती.

वैमानिकाला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्याने त्याने तत्काळ विमान दिल्लीला परत नेण्याचा निर्णय घेतला. दुपारी ४:२५ वाजता दिल्लीहून निघालेले हे विमान रांचीला ६:२० वाजता पोहोचणार होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे ते नियोजित स्थळी पोहोचू शकले नाही. तपासणी आणि तांत्रिक दुरुस्तीनंतरच विमानाने आपला पुढील प्रवास सुरू केला.

अहमदाबाद विमान अपघात आणि उच्चस्तरीय समितीची बैठकएकीकडे एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही घटना समोर आली असतानाच, दुसरीकडे अहमदाबादमधील अलीकडील विमान अपघातावरून सध्या देशात वातावरण तापले आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय समिती स्थापन केली आहे. या समितीने सोमवारी अहमदाबादमधील विमान अपघातासाठी जबाबदार असलेल्या विविध संभाव्य कारणांवर सविस्तर चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने अपघाताच्या संभाव्य कारणांबाबत विविध भागधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली.

दिल्लीत झालेल्या समितीच्या या पहिल्या बैठकीचा मुख्य उद्देश विमान अपघाताच्या संभाव्य कारणांचे विश्लेषण करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मानक कार्यपद्धती अर्थात एसओपी तयार करणे हा होता. या बैठकीला नागरी विमान वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय, भारतीय हवाई दल, गुप्तचर विभाग, गुजरात सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो या महत्त्वाच्या विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाdelhiदिल्ली