मागील महिन्यात एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये मोठा अपघात झाला. या अपगातामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचा चौकशी अहवाल समोर आला. यामध्ये इंधन नियंत्रण स्विचमध्ये समस्या असल्याचे समोर आले. यानंतर एअर इंडियाने सगळ्याच बोईंग विमानाच्या स्विचची तपासणी केली. या विमानांमधील इंधन नियंत्रण स्विच 'लॉक' करण्याच्या प्रणालीमध्ये कोणतीही समस्या आढळली नसल्याची माहिती एअर इंडियाने दिली.
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
यापूर्वी, अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत AAIB चा प्राथमिक तपास अहवाल समोर आल्यानंतर, DGCA ने सर्व नोंदणीकृत विमानांमधील इंधन स्विचची तपासणी अनिवार्य करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी, DGCA ने विमान कंपन्यांना बोईंग 787 आणि 737 विमानांमधील 'फ्युएल स्विच लॉकिंग' सिस्टम तपासण्यास सांगितले होते. 'गेल्या महिन्यात अपघातापूर्वी एअर इंडियाच्या विमानात इंधन स्विच बंद होते, असं AAIB च्या प्राथमिक चौकशी अहवालात आढळून आले.
एअर इंडियाने माहिती दिली
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने वैमानिकांना पाठवलेल्या अंतर्गत संदेशाचा हवाला देत सांगितले की, "आमच्या अभियांत्रिकी पथकाने आमच्या सर्व बोईंग 787 विमानांच्या इंधन नियंत्रण स्विचला लॉक करण्याच्या यंत्रणेची खबरदारीची तपासणी सुरू केली होती. तपासणी पूर्ण झाली आहे आणि कोणतीही समस्या आढळली नाही." सर्व बोईंग 787-8 विमानांमध्ये थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल स्वीकारण्यात आला आहे. इंधन नियंत्रण स्विच या मॉड्यूलचा एक भाग आहे. इंधन नियंत्रण स्विच विमानाच्या इंजिनमधील इंधनाचा प्रवाह नियंत्रित करतो.
यापूर्वी, एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानाच्या अपघातानंतर एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने शनिवारी आपला प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. AAIB ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एअर इंडियाच्या AI-171 च्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा करणारे स्विच टेकऑफच्या काही सेकंदातच बंद झाले होते, यामुळे ते लगेचच क्रॅश झाले. 'कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग'मध्ये एका पायलटने दुसऱ्याला इंधन का बंद केले असे विचारल्याचे ऐकू आले,असंही अहवालात म्हटले आहे.