नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या तणावाचा मोठा फटका आता विमान वाहतुकीला बसला आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानंतर, एअर इंडिया एक्स्प्रेसने रविवारी अबुधाबी, रास अल खैमाह आणि शारजाह या तीन महत्त्वाच्या शहरांसाठी जाणारी आपली सर्व नियोजित उड्डाणे रद्द केली आहेत. पश्चिम आशियातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे हवाई क्षेत्रावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
केवळ एकाच विमानाचे उड्डाण होणार -परिणामी या सेवांमध्ये कपात करण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागला आहे. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिल्ली-दुबई मार्गावर केवळ एक विमान येण्या-जाण्यासाठी चालवले जाईल.
मात्र, हे उड्डाणदेखील दुबई विमानतळावरील स्लॉटची उपलब्धता आणि तेथील परिस्थितीवर अवलंबून असेल. याशिवाय, रविवारी चालवण्यात येणाऱ्या अनेक अनियोजित विमानांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
Web Summary : Growing Middle East tensions disrupt Air India Express UAE flights. Abu Dhabi, Ras Al Khaimah, Sharjah flights cancelled following directives. Only one Delhi-Dubai flight operates, subject to slot availability. Unscheduled flights also reduced.
Web Summary : मध्य पूर्व में बढ़ते तनाव के कारण एयर इंडिया एक्सप्रेस की यूएई उड़ानें बाधित हुईं। अबू धाबी, रास अल खैमाह, शारजाह की उड़ानें रद्द कर दी गईं। दिल्ली-दुबई मार्ग पर केवल एक उड़ान स्लॉट की उपलब्धता के अधीन संचालित होती है। अनियमित उड़ानें भी कम की गईं।