एअर इंडियाच्या कर्मचा-यांची चिंधीगिरी, जेवण चोरल्याचा आरोप
By Admin | Updated: February 8, 2017 12:52 IST2017-02-08T12:31:53+5:302017-02-08T12:52:18+5:30
लंडनच्या एका हॉटेलने एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सवर खाद्य पदार्थ चोरी करण्याचा आरोप केला आहे.

एअर इंडियाच्या कर्मचा-यांची चिंधीगिरी, जेवण चोरल्याचा आरोप
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - सरकारी विमानसेवा देणारी कंपनी एअर इंडियाबाबत एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. लंडनच्या एका हॉटेलने एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सवर खाद्य पदार्थ चोरी करण्याचा आरोप केला आहे. एअर इंडियाचे कर्मचारी डब्यांमध्ये भरून खाण्याचे पदार्थ घेऊन जातात असा आरोप हॉटेलने केला आहे.
या आरोपाला गंभीरतेने घेत एअर इंडियाने आपल्या वैमानिकांसह सर्व कर्मचा-यांना ताकीद दिली आहे. ज्यामुळे एअर इंडियाची बदनामी होईल अशे प्रकार पुन्हा होऊ नये अशी ताकीद एअर इंडियाने दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे.
एअर इंडियाचे कर्मचारी आपल्यासोबत डब्बा घेऊन येतात, आणि डब्यांमध्ये खाण्याचे पदार्थ घेऊन जातात असा आरोप करणारा इमेल हॉटेलने एअर इंडियाला पाठवला आहे. त्यानंतर एअर इंडियाने आपल्या कर्मचा-यांना ताकीद दिली आहे.