एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताना फुटला टायर, प्रवासी सुखरूप
By Admin | Updated: April 24, 2017 18:38 IST2017-04-24T18:38:30+5:302017-04-24T18:38:30+5:30
केरळमधल्या कारिपूर विमानतळावर दुबईला जाणा-या एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त होताना थोडक्यात बचावलं आहे.
_ns.jpg)
एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताना फुटला टायर, प्रवासी सुखरूप
ऑनलाइन लोकमत
कोझिकोड, दि. 24 - केरळमधल्या कारिपूर विमानतळावर दुबईला जाणा-या एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त होताना थोडक्यात बचावलं आहे. विमान रन वेवरून उड्डाण करत असतानाच अचानक त्याच्या इंजिनामध्ये बिघाड झाला आणि त्याच वेळी त्या विमानाचा टायरही फुटला. त्यामुळे हे विमान अपघात होता होता वाचलं आहे.
सुदैवानं या दुर्घटनेतून विमानातील 190 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप बचावले आहेत. एअर इंडियाच्या एआय- सी 937 हे विमान उड्डाण घेत असताना डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये सकाळी 11.35 वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला, अशी माहिती विमानतळ संचालक के. जनार्दनन यांनी पीटीआयला दिली आहे. उड्डाण घेत असतानाच विमानाचा टायर रन वेवरील जमिनीला घासून फुटला. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
मात्र वैमानिकानं वेळीच प्रसंगावधान दाखवत विमानावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. विमानातील प्रवाशांसह 191 प्रवासी आणि एक क्रू मेंबर्स सुखरूप असल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे.