शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:39 IST

अहमदाबादहून लंडन गॅटविकसाठी उड्डाण करत असलेले हे विमान टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळले. यावेळी मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला होता.

गुजरातमधील अहमदाबाद येथे एक भीषण विमान अपघात घडला असून, एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर ७८७ हे विमान टेक ऑफ करताच कोसळले. या विमानात २४२ प्रवासी व १० क्रू मेंबर्स होते. एअर इंडियाचे हे विमान मेघानी नगर या नागरी वस्तीतील रुग्णालयाच्या इमारतीवर कोसळले. अहमदाबादहून लंडन गॅटविकसाठी उड्डाण करत असलेले हे विमान टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळले. यावेळी मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला होता. या अपघातावेळी नेमकं काय झालं, हे तिथल्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने पीटीआयशी बोलताना सांगितलं. 

जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन्

एअर इंडिया विमानाचा अपघात घडला त्यावेळी तिथेच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं. तो म्हणाला, "एअर इंडियाचे हे विमान कोसळले तेव्हा मी घरी होतो, अचानक एक स्फोटक आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकून आम्ही बाहेर येऊन पाहिलं, तेव्हा समोर काळसर धुराचे मोठे लोट दिसत होते. जेव्हा आम्ही धावत धावत इथे पोहोचलो, तेव्हा अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आणि मृतदेह सगळीकडे विखुरलेले दिसले."

कसा घडला अपघात?

एअर इंडियाचे बोईंग-७८७ हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी रवाना झाले होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच विमान हळूहळू खाली येऊ लागले. खाली येत असतानाच विमान विमानतळ परिसरातच एका पाच मजली इमारतीवर आदळले. इमारतीला धडकल्यानंतर विमानाने पेट घेतला. 

दुपारी १.३१ वाजता उड्डाण केल्यानंतर केवळ सात मिनिटांतच, म्हणजेच १.३८ वाजता विमानाचा संपर्क तुटला आणि काही क्षणातच हा मोठा अपघात झाला.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात