हवाई दलाचं हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये बेपत्ता,शोधमोहीम सुरू
By Admin | Updated: July 4, 2017 22:49 IST2017-07-04T21:05:14+5:302017-07-04T22:49:54+5:30
भारतीय हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशमध्ये बेपत्ता झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. अरुणाचल प्रदेशच्या सगली गावाजवळ हे हेलिकॉप्टर बेपत्ता

हवाई दलाचं हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये बेपत्ता,शोधमोहीम सुरू
>ऑनलाइन लोकमत
ईटानगर, दि. 4 - भारतीय हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशमध्ये बेपत्ता झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. अरुणाचल प्रदेशच्या सगली गावाजवळ हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची शक्यता असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, इटानगर ते नहरलगून दरम्यान हेलिकॉप्टर अचानक रडारवरून गायब झालं आहे. हवाई दलाचं हे हेलिकॉप्टर पुरस्थिती असलेल्या परिसरांमध्ये बचाव मोहीमेवर होतं.
ही घटना घडली त्याचवेळी केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हेलिकॉप्टरचीही इमर्जन्सी लॅन्डिंग करावी लागली. इटानगरमध्ये पॉलिटेक्निक क्रीडा मैदानात रिजिजू यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लॅन्डिंग केली. रिजिजू यांनीच मीडियाला याबाबत माहिती दिली.