शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण नाही : एअर चीफ मार्शल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:49 IST

संरक्षण यंत्रणेत खरेदीतील विलंबाबाबत तीव्र चिंता

नवी दिल्ली : एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी संरक्षण यंत्रणेच्या खरेदी आणि वितरणात होणाऱ्या विलंबावर गुरुवारी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी ही समस्या तातडीने सोडविण्याची गरज व्यक्त करीत 'ऑपरेशन सिंदूर' हा 'राष्ट्रीय विजय' असल्याचे गौरवोद्‌गारही काढले.

एअर चीफ मार्शल म्हणाले, एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही. आपण अशी आश्वासने का देतो जी पूर्ण होऊ शकत नाहीत हा विचार करण्यासारखा विषय आहे. अनेक वेळा, करारावर स्वाक्षरी करताना, आपल्याला माहीत असते की ते वेळेवर होणार नाही, तरीही आपण त्यावर स्वाक्षरी करतो, ज्यामुळे संपूर्ण व्यवस्था बिघडते. एखाद्या लष्करप्रमुखाने अशा प्रकारे यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेत, एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले की, संरक्षण प्रकल्प वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे, ऑपरेशनल तयारीवर परिणाम होतो.

नेमके काय झालेय? 

अद्याप ४० जेट सैन्याला मिळालेली नाहीत. तर चीनसारखे देश त्यांची ताकद वाढवत आहेत. तेजस एमके१ए लढाऊ विमानासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये एचएएलसोबत ४८,००० कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. मार्च २०२४ पासून डिलिव्हरी सुरू होणार होती; परंतु, आजपर्यंत एकही विमान आलेले नाही.

एअर चीफ म्हणाले... 

आपल्याला आजसाठी तयार राहावे लागेल, तरच आपण भविष्यासाठी तयारी करू शकू. जेव्हा आपले सैन्य भक्कम असते तेव्हा युद्धे जिंकली जातात. सैन्याला भक्कम बनविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

आपल्याला सैन्य आणि उद्योग यांच्यात विश्वासाची आवश्यकता आहे. आपल्याला खूप मोकळेपणा दाखवण्याची आवश्यकता आहे. एकदा आपण एखाद्या गोष्टीसाठी वचनबद्ध झालो की आपण ते पूर्ण केले पाहिजे-अमरप्रीत सिंग, एअर चीफ मार्शल

पीओकेतील लोक लवकरच भारतात येतील : राजनाथ सिंह

पीओकेमधील लोक भारतीय कुटुंबाचा भाग आहेत आणि तो दिवस दूर नाही जेव्हा ते अंतरात्म्याचा आवाज ऐकतील आणि भारतात परत येतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलOperation Sindoorऑपरेशन सिंदूर