एअर ऍम्ब्युलन्सला अपघात, सातही प्रवासी सुखरुप
By Admin | Updated: May 24, 2016 16:09 IST2016-05-24T16:09:43+5:302016-05-24T16:09:43+5:30
दिल्लीजवळील नजाफगड भागात एअर ऍम्ब्युलन्सला आज दुपारी अपघात झाला. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. एअरलाइन्स कंपनीचे एअर ऍम्ब्युलन्स पाटणावरून दिल्लीकडे जात होते

एअर ऍम्ब्युलन्सला अपघात, सातही प्रवासी सुखरुप
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ : दिल्लीजवळील नजाफगड भागात एअर ऍम्ब्युलन्सला आज दुपारी अपघात झाला. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलछेमिस्ट एअरलाइन्स कंपनीचे एअर ऍम्ब्युलन्स पाटणावरून दिल्लीकडे जात होते. नजाफगड भागात आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एअर ऍम्ब्युलन्सला अपघात झाला. यावेळी ऍम्ब्युलन्समध्ये सात प्रवासी होते. अपघातात पाच जण जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत. एअर ऍम्ब्युलन्सच्या वैमानिकाच्या सजकतेमुळे ७ प्रवाशांचे जीव वाचले आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे.