शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

"आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत", मोहन भागवतांच्या विधानावर ओवैसींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 13:53 IST

asaduddin owaisi : अखिलेश यांनी त्यांच्या सरकारच्या काळात योगींविरोधात खटला चालवला असता तर योगी काही करू शकले नसते. कारण त्या सर्वांना मुस्लिमांनी पुढे जावे असे वाटत नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

लखनऊ : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून राजकीय दंगल सुरू झाली आहे. AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दरम्यान माजी खासदार अतिक अहमद यांची पत्नी शाइस्ता परवीन यांनी  AIMIM मध्ये प्रवेश केला. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

ज्या नेत्यांची नावे मुझफ्फरनगर दंगलीत आली होती, त्यांच्याकडून खटला मागे घेण्यात आल्याचे असदुद्दीन ओवैसी म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील खटलेही मागे घेण्यात आले. प्रज्ञा आणि कुलदीप सेंगरसारखे नेते लोकप्रिय असतील, परंतु अतीक अहमद किंवा मुख्तार अन्सारी यांना बाहुबली म्हटले जाते, असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत. पण तुम्हा सर्वांनाही ती करावे लागेल. हे लोक भारताचे संविधान स्वीकारणार नाहीत, पण डीएनए चाचणी करून घेतील. आरएसएसवाले इतिहासात कमकुवत आहेत. दरम्यान, मोहन भागवत यांनी म्हटले होते की, भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत.

याचबरोबर, असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पक्षांना 19 टक्के मुस्लिमांनी त्यांची गुलामगिरी करावी असे वाटते, पण कोणीही हिस्सेदारीबाबत बोलत नाही. अखिलेश यांनी त्यांच्या सरकारच्या काळात योगींविरोधात खटला चालवला असता तर योगी काही करू शकले नसते. कारण त्या सर्वांना मुस्लिमांनी पुढे जावे असे वाटत नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुप्रिया पटेल यांना मंत्रीही केले. कारण जातीच्या मतांची गरज आहे. पण जेव्हा मुस्लिमांचा प्रश्न येतो, तेव्हा मुद्दा जातीय बनतो. मुस्लिमांनी राजकीय पक्षांना भरपूर मतदान केले, पण कोणीही जिंकू शकले नाही, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

काय म्हणाले होते मोहन भागवत?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत आयोजित 'राष्ट्रप्रथम-राष्ट्र सर्वोपरी' कार्यक्रमात संबोधित करताना ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचे काम केल्याचे म्हटले आहे. "भारतात हिंदूंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही. फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले", असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे. 

ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचे वातावरण निर्माण केले. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केले. इस्लाम धर्म भारतातून नष्ट होईल असे सांगितले गेले. पण तसे झालंय का? तर नाही. मुस्लिमांना आज सर्व स्तरांमध्ये हक्काचे स्थान आहे, असे मोहन भागवत म्हणाले.  ब्रिटिशांना जे हवे होते ते त्यांनी त्यावेळी साध्य केले. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवला आणि फोडाफोडी केली. आपल्याला आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वच एकच होते. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUttar Pradeshउत्तर प्रदेशMohan Bhagwatमोहन भागवत