शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 03:31 IST

ओवेसी म्हणाले, "तुम्ही लोक सत्तेवर आहात आणि एवढे कट्टरपंथी झाला आहात की, न्यायालयालाही धार्मिक युद्धाची धमकी देत ​​आहात. मोदीजी, जर आपण या लोकांना रोखले नाही, तर..."

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयासंदर्भात केलेल्या विधानावरून, विरोधक आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. "तुम्ही लोक (भाजप) ट्यूबलाईट आहात. अशाप्रकारे न्यायालयाला धमकावत आहात. संविधानातील कलम १४२ काय आहे, हे आपल्याला माहीत आहे का? ते बीआर आंबेडकर यांनी तयार केले होते. ते आपल्यापेक्षा अधिक दूरदृष्टी असलेले व्यक्ती होते. भाजप फशवणूक करत आहे आणि धार्मिक युद्धाची धमकी देत घाबरवत आहे. 

ओवेसी पुढे म्हणाले, तुम्ही लोक सत्तेवर आहात आणि एवढे कट्टरपंथी झाला आहात की, न्यायालयालाही धार्मिक युद्धाची धमकी देत ​​आहात. मोदीजी, जर आपण या लोकांना रोखले नाही, तर देश कमकुवत होईल. देश आपल्याला माफ करणार नाही आणि उद्या आपण सत्तेवर नसाल. वक्फ कायदा झाल्याने नोकरी मिळणार आहे का? हे भारतातील हिंदूंच्या लक्षात आले आहे. भाजप मुस्लिमांप्रती द्वेष पसरवून मते मिळवते, हे हिंदूंना समजले आहे. दाखवण्यासाठी काही नाही. ४.५ टक्के तरुण बेरोजगार आहेत. त्यांची बेरोजगारी दूर करण्यासाठी कसलीही योजना नाही.

नेमकं काय म्हणाले होते निशिकांत दुबे? -भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयासंदर्भात भाष्य केले होते. "देशातील वाढत्या धार्मिक तणावासाठी सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. न्यायालय आपल्या मर्यादा ओलांडत आहे. न्यायालय संसदेने पारित केलेले कायदे रद्द करत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या राष्ट्रपतींनाही निर्देश देत आहे."

दुबे पुढे म्हणाले, "संविधानाच्या कलम ३६८ नुसार, कायदे करणे हे संसदेचे काम आहे आणि न्यायालयाची भूमिका कायद्याची व्याख्या करणे आहे. जर प्रत्येक कामासाठी सर्वोच्च न्यायालयातच जायचे असेल तर, संसद बंद करावी का? जर प्रत्येक गोष्टीसाठी कायदा बनला आहे, तर सर्वोच्च न्यायालय नवीन कायदा कुठून आणि कसा बनवत आहे?"

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय