शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर ओवेसी, दिग्विजय सिंहांचा निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:48 IST

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली/मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी म्हटले होते, की सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो. एवढेच नाही, तर लिंचिंगसंदर्भात बोलताना ते म्हणाले होते, यात सहभागी असलेले लोक हिंदुत्वाविरोधात आहेत आणि लोकशाहीत हिंदूंचे अथवा मुस्लिमांचे प्रभूत्व राहू शकत नाही. (AIMIM Asaduddin owaisi tweet on mohan bhagwat's statement cowardice violence and killing are part of godse's hindutva thinking)

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. तर दिग्विजय सिंह यांनी,  अशी शिकवण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का? असा सवाल केला आहे.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ''आरएसएस प्रमुख भागवत म्हणतात, की लिंचिंग करणारे हिंदुत्व विरोधी आहेत. यांना गाय आणि म्हैस यांच्याचील फरक माहीत नसेल. मात्र, मारण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलू, रकबर, अलीमुद्दीन नावेच पुष्कळ होती. हा द्वेश हिंदुत्वाची देण आहे. या गुन्हेगारांना हिंदुत्ववादी सरकारचे रक्षण आहे.''

भाजपवरही निशाणा - ओवेसींनी म्हटले, अखलाकला मारणाऱ्यांच्या मृतदेहावर तिंरंगा लावला जातो. आसिफला मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ महापंचायत बोलावली जाते. येथे भाजपचा प्रवक्ता विचारतो, की आम्ही हत्याही करू शकत नाही? ते म्हणाले हा भ्याडपणा, हिंसा आणि खून करणे गोडसेंच्या हिंदुत्ववादी विचारांचे अभिन्न अंग आहे. मुस्लिमांचे लिंचिंगदेखील याच विचारांचा परिणाम आहे.

 काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही भागवतांच्या वक्तव्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ''मोहन भागवत हा विचार आपले शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही देणार का? हीच शिकवण आपण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का?"

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत -एनसीपी नेते नवाब मलिक यांनी सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की ''मोहन भागवतांचे वक्तव्य, की भारतात राहणाऱ्या सर्वांचा डिएनए एकच आहे. जर भागवतांचे हृदय परिवर्तन होत असेल तर आम्ही त्याचे स्वाग तरतो. वर्ण व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे संघटन जर धर्माच्या सीमा तोडू इच्छित असेल, तर ही चांगली गोष्ट आहे.''

नेमकं काय म्हणाले होते मोहन भागवत?- ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. एकतेचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा ‘संवाद’ आहे, विसंवाद नव्हे. - सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे. मग त्यांचा धर्म कोणताही असो. हिंदू-मुस्लिम एकतेची चर्चा दिशाभूल करणारी आहे. कारण ते वेगळे नसून एकच आहेत. - आपण लोकशाही देशात आहोत. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. येथे केवळ भारतीयांचे वर्चस्व असू शकते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीDigvijaya Singhदिग्विजय सिंहMohan Bhagwatमोहन भागवतnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस