शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Owaisi On Rahul Gandhi: 'देशात पुन्हा एकदा हिंदूंचं राज्य आणायचंय', राहुल गांधींच्या वक्तव्यावर ओवेसी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 19:25 IST

देशात २०१४ पासून हिंदूंचे राज्य आहे, आपल्याला पुन्हा एकदा हिंदूंचे राज्य आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल यांच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी थेट प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (रविवार) जयपूर येथे मोठी घोषणा केली. देशात २०१४ पासून हिंदूंचे राज्य आहे, आपल्याला पुन्हा एकदा हिंदूंचे राज्य आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल यांच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी थेट प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे. तुम्हीच हिंदुत्वासाठी मैदान तयार केले, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. (Asaduddin Owaisi on Rahul Gandhi)

राहुल गांधी यांच्या घोषणेवर ट्विट करत असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "राहुल आणि काँग्रेसनेच हिंदुत्वासाठी जमीन तयार केली आहे. आता ते बहुसंख्यवादाचे पीक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंना सत्तेत आणणे हा 2021 साठीचा एक 'धर्मनिरपेक्ष' अजेंडा झाला आहे. वा! भारत सर्व भारतीयांचा आहे. एकट्या हिंदूंचा नाही. भारत सर्व धर्मांच्या लोकांचा आहे आणि जे धर्मावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांचाही आहे. "

राहुल गांधी यांनी आज जयपूर येथे 'महागाई हटाओ रॅली'ला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, "हा देश हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही. देशात महागाई असेल, त्रास असेल, तर हे काम हिंदुत्ववाद्यांनी केले आहे. हिंदुत्ववाद्यांना कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे." हिंदू आणि हिंदुत्व हे दोन्ही भिन्न असल्याचे सांगत राहुल म्हणाले, ज्याप्रमाणे दोन जीवांचा एक आत्मा असू शकत नाही, त्याचप्रमाणे दोन शब्दांचा एकच अर्थ असू शकत नाही, कारण प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ होत असतो.

'मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही...' - राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. हे सर्व हिंदू आहेत पण हिंदुत्ववादी नाहीत. आज मला तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्ववादी यातील फरक सांगायचा आहे. महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी. काहीही झाले तरी हिंदू सत्याचा शोध घेतो. गर पडली तर तो त्यासाठी जीवाचीही परवा करत नाही, तो सत्याचा शोध घेतो. त्याचा मार्ग सत्याग्रहाचा आहे. तो संपूर्ण जीवन सत्याच्या शोधात घालवतो. महात्मा गांधींनी माय एक्सपिरियन्स विथ ट्रुथ हे आत्मचरित्र लिहिले, म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्याच्या प्रयत्नात घालवले आणि शेवटी एका हिंदुत्ववाद्याने त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या, असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाHinduहिंदूMuslimमुस्लीम