‘एसबीआय’मधील खात्यातून ‘एम्स’चे १२ कोटी पळविले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 06:27 AM2019-12-01T06:27:25+5:302019-12-01T06:27:49+5:30

हा घोटाळा मागील एक महिन्याच्या अवधीत घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

'AIIMS' escapes from 'SBI' account! | ‘एसबीआय’मधील खात्यातून ‘एम्स’चे १२ कोटी पळविले!

‘एसबीआय’मधील खात्यातून ‘एम्स’चे १२ कोटी पळविले!

googlenewsNext

नवी दिल्ली : बँकांमधील घोटाळे आणि गैरव्यवस्थापनाचा फटका देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था ‘एम्स’लाही बसला आहे. स्टेट बँक आॅफ इंडियामधील ‘एम्स’च्या दोन बँक खात्यांतून बनावट धनादेशांच्या (क्लोन्ड चेक) माध्यमातून तब्बल १२ कोटी रुपये लंपास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा घोटाळा मागील एक महिन्याच्या अवधीत घडल्याचे सूत्रांनी सांगितले.
१२ कोटी रुपये लंपास झाल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर गेल्याच आठवड्यात एसबीआयच्या देहरादून आणि मुंबईतील शाखेतून आणखी २९ कोटी रुपये बनावट धनादेशांच्या माध्यमातून पळविण्याचा प्रयत्न भामट्यांनी केला. रुग्णालयाच्या वतीने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली. घोटाळा उघडकीस आल्यानंतर घोटाळेखोरांनी एसबीआयच्या देहरादून शाखेतून २० कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तसेच मुंबईतील शाखेतूनही ९ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘यूव्ही रे टेस्ट’मध्ये हे चेक उत्तीर्ण
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या बनावट धनादेशांचा वापर करून भामट्यांनी पैसे लंपास केले, ते बनावट असल्याचे बँकेच्या पडताळणी यंत्रणेला ओळखता आले नाही. ‘यूव्ही रे टेस्ट’मध्ये हे चेक उत्तीर्ण झाले. भामट्यांनी पैसे काढण्यासाठी वापरलेल्या क्रमांकाचे मूळ धनादेश अजूनही एम्सकडे आहेत. याची माहिती एम्सने आरोग्य मंत्रालयाला दिली आहे. बाहेरच्या शाखेतील धनादेश वटविताना धनादेशांची पडताळणी करण्याची पद्धती एसबीआयने नीट वापरली नाही. त्यामुळे हा घोटाळा झाला आहे. बँकेच्या चुकीमुळे हा घोटाळा झाल्यामुळे चोरीला गेलेले आपले पैसे बँकेने आपल्या खात्यावर जमा करावेत, असे एम्सने म्हटले आहे.

Web Title: 'AIIMS' escapes from 'SBI' account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय