शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
3
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
4
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
5
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
6
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
7
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
9
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
10
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
11
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
12
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
13
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
14
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
15
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
16
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
17
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
18
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
19
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
20
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
Daily Top 2Weekly Top 5

सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 21:45 IST

महत्वाचे म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांनी निगेटिव्ह व्यक्तींशी विवाह करू नये, असेही डॉ. अख्तर यांनी म्हटले आहे. 

बिहारमधील सीतामढी जिल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, येथे एचआईव्ही पॉझिटिव्ह रुग्णांचा जो आकडा समोर आला आहे. तो धक्कादायक आहे. जिल्यात एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 7,400 पर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे. दरमहिन्याला 40 ते 60 नवे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, असे असले तरी, एड्सग्रस्त रुग्णांच्या एकूण संख्येसंदर्भात अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, या रुग्णांमध्ये 400 हून अधिक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सीतामढीमध्ये अशी गंभीर स्थिती का निर्माण झाली? यासंदर्भात एका माध्यमाशी बोलताना सदर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हसीन अख्तर म्हणाले, जिल्ह्यात परराज्यात काम करणाऱ्या स्थलांतरितांची संख्या मोठी असल्याने संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. दिल्ली, मुंबईसह विविध शहरांतून परतणारे अनेक जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळत आहेत.

"पॉझिटिव्ह रुग्णांनी निगेटिव्ह व्यक्तींशी विवाह करू नये" -सीतामढीच्या एआरटी केंद्रातून दरमहिन्याला 5000 रुग्णांना औषधी पुरवली जात आहे. तर उर्वरित रुग्ण बिहारबाहेर उपचार घेत आहेत. महत्वाचे म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांनी निगेटिव्ह व्यक्तींशी विवाह करू नये, असेही डॉ. अख्तर यांनी म्हटले आहे. 

खरे तर, सरकारी पातळीवर जागरूकता मोहीम राबवली जात असली तरी रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक आहे. लहान मुलांमध्ये त्यांच्या आई वडिलांकडून संक्रमण आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने एआरटी केंद्राच्या माध्यमातून जागरूकता अभियान अधिक वेगाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गावागावांत एचआयव्ही चाचण्या करण्याची तयारी सुरू आहे.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीनुसार, एकूण एचआयव्ही बाधितांची संख्या 6707 एवढी -दरम्यान, सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीनुसार, सीतामढीतील एकूण एचआयव्ही बाधितांची संख्या 6707 एवढी आहे. यांपैकी 428 मुले आहेत. महत्वाचे म्हणजे हा आकडा 1 डिसेंबर 2012 ते 1 डिसेंबर 2025 या 13 वर्षांतील असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, डिसेंबर 2025 पर्यंत बिहारमध्ये 97 हजार एड्सग्रस्त लोक आढळल्याचेही बोलले जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : HIV outbreak in Sitamarhi: 7400 cases, doctor advises against marriage.

Web Summary : Sitamarhi, Bihar, reports a surge in HIV cases, reaching 7400, including over 400 minors. Migration is a key factor. Doctors advise HIV-positive individuals against marrying HIV-negative partners. Awareness campaigns are intensifying.
टॅग्स :HIV-AIDSएड्सBiharबिहारdoctorडॉक्टर