AI Summit: राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या AI समिट 2026 दरम्यान यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपले शर्ट काढून भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात जोरदार निदर्शने केली होती. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून, भाजपने आता काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे.
AI समिटमध्ये निदर्शने
शुक्रवारी (20 फेब्रुवारी) यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी AI समिटदरम्यान आपले शर्ट काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. “PM is compromised” असे नारे देत त्यांनी निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे समिटमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भाजपकडून देशभर आंदोलन
या घटनेच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी (21 फेब्रुवारी) दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात येथे काँग्रेसविरोधात आंदोलन केले. दिल्लीतील अकबर रोडवरील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी “देशद्रोही राहुल गांधी माफी मागा” अशा मजकुराचे पोस्टर्स घेऊन निदर्शने केली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अकबर रोडवर दोन स्तरांचे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला. मात्र संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडले. या गोंधळात काही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनात दिल्ली भाजप अध्यक्ष विनोद सचदेवा आणि खासदार मनोज तिवारी सहभागी झाले होते.
मनोज तिवारी यांचा काँग्रेसवर आरोप
निदर्शनादरम्यान खासदार मनोज तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, AI शिखर परिषदेला 80 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि सर्वांनी भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले. काँग्रेसने भाडोत्री गुंड आणून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार देशद्रोहासारखा आहे आणि जनता काँग्रेसला माफ करणार नाही.
अटक केलेले यूथ काँग्रेस कार्यकर्ते कोर्टात हजर
AI समिटमधील निदर्शनांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार यूथ काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. अटक केलेल्यांमध्ये कृष्णा हरि (यूथ काँग्रेस सेक्रेटरी), कुंदन यादव (बिहार स्टेट सेक्रेटरी), अजय कुमार (उत्तर प्रदेश स्टेट व्हाइस प्रेसिडेंट), नरसिंहा यादव (नॅशनल कोऑर्डिनेटर) यांचा समावेश आहे. बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले की, हे सर्व कार्यकर्ते शांततापूर्ण आंदोलन करत होते, कोणतेही नुकसान झालेले नाही. तसेच, निषेध व्यक्त करणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
Web Summary : Youth Congress protests at the AI Summit against a US trade deal triggered political clashes. BJP activists protested against Congress, accusing them of treason for disrupting the event. Police detained protestors in Delhi.
Web Summary : एआई शिखर सम्मेलन में अमेरिकी व्यापार समझौते के खिलाफ यूथ कांग्रेस के विरोध से राजनीतिक टकराव शुरू हो गया। भाजपा कार्यकर्ताओं ने कांग्रेस पर कार्यक्रम में बाधा डालने के लिए राजद्रोह का आरोप लगाते हुए विरोध प्रदर्शन किया। दिल्ली में पुलिस ने प्रदर्शनकारियों को हिरासत में लिया।