आहुर्ली सरपंचपदी वाघ, उपसरपंचपदी गायकर

By Admin | Updated: May 8, 2014 20:53 IST2014-05-08T20:53:49+5:302014-05-08T20:53:49+5:30

आहुर्ली, दि. ८ : आहुर्ली-वांजोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुंजा वाघ यांची, तर उपसरपंचपदी तुकाराम विष्णू गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Ahurli sarpanchapadi wagh, sub panchapadapi gaayak | आहुर्ली सरपंचपदी वाघ, उपसरपंचपदी गायकर

आहुर्ली सरपंचपदी वाघ, उपसरपंचपदी गायकर

ुर्ली, दि. ८ : आहुर्ली-वांजोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुंजा वाघ यांची, तर उपसरपंचपदी तुकाराम विष्णू गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नऊ सदस्यीय आहुर्ली ग्रामपंचायतच्या तीन जागा रिक्त आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी बागुल यांचे अध्यक्षतेखाली आयोजित निवडणुकीत अनुसूचित जमाती राखीव सरपंचपदाच्या जागेसाठी रुंजा वाघ यांचा, तर उपसरपंच पदासाठी तुकाराम गायकर यांचा एकेक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सिंधुबाई निवृत्ती गायकर, संतू गोंदळे, सखुबाई रामदास गायकर हजर होते. एक सदस्य गैरहजर होता. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच निवडीचे जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, ॲड. संदीप गुळवे, माकपाचे कॉ. देवीदास आडोळे यांनी स्वागत केले.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वामन गायकर, मधुकर गायकर, गोविंद खकाळे, दत्तू खकाळे, गणपत खकाळे, भाऊसाहेब गायकर, बबन गायकर आदिंसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, आहुर्ली हे गाव वैतरणा व मुकणे धरणाच्या काठाशी असूनही आजही गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. आगामी काळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास आपण प्राधान्यक्रम देऊ अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच तुकाराम गायकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Web Title: Ahurli sarpanchapadi wagh, sub panchapadapi gaayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.