अहमदाबादमध्ये शाहरुखची गाडी फोडली
By Admin | Updated: February 14, 2016 13:07 IST2016-02-14T13:07:21+5:302016-02-14T13:07:21+5:30
'रईस' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अहमदाबादमध्ये आलेल्या शाहरुख खानच्या गाडीवर रविवारी सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.

अहमदाबादमध्ये शाहरुखची गाडी फोडली
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १४ - 'रईस' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अहमदाबादमध्ये आलेल्या शाहरुख खानच्या गाडीवर रविवारी सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. 'जय श्रीराम', शाहरुख हाय हाय अशी घोषणाबाजी या दगडफेकीच्यावेळी करण्यात आली.
यामहिन्याच्या सुरुवातीलाच गुजरातच्या भूजमध्ये रईस चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलेल्या शाहरुख विरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये शाहरुखच्या चित्रपटांविरोधात निदर्शने करण्यात आली होती. देशात असहिष्णूता वाढत असल्याचे विधान केल्यापासून देशाच्या विविध भागांमध्ये शाहरुख विरोधात निदर्शने झाली आहेत. याच मुद्यावरुन शाहरुखच्या 'दिलवाले' चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. काही प्रमाणात त्याचा फटकाही दिलवाले चित्रपटाला बसला होता.