शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 2:44 AM

‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमातून अमेरिका-भारत संबंधात सुधारणा होतील; ‘हाउडी मोदी’ टीमला अपेक्षा

ह्यूस्टन : मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करणाऱ्या टीमचे असे म्हणणे आहे की, ट्रम्प यांचा भारत दौरा द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प हे २४ आणि २५ रोजी भारताच्या दौºयावर येत आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झाले आहे.जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियमवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रम्प आणि मोदी यांनी सप्टेंबरमध्ये ह्यूस्टनमध्ये भारत आणि अमेरिकी नागरिकांसोबत हाउडी मोदी कार्यक्रमास हजेरी लावली होती. आता भारतात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात हे दोन नेते एकत्र येत आहेत. स्टेडियममध्ये रॅलीने जाण्यासाठी रोड शो करण्यात येणार आहे. ह्यूस्टनमधील हाउडी मोदी कार्यक्रमाचे संयोजक जुगल मलानी यांनी म्हटले आहे की, नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी आयोजक खूप मेहनत करीत आहेत. या दोन्ही नेत्यांनी ह्यूस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमात ५० हजार भारतीय-अमेरिकींना संबोधित केले होते. हाउडी मोदीचे आयोजक टेक्सास इंडिया फोरम हे पाहून आनंदी आहे की, या कार्यक्रमाने अमेरिका-भारत संबंधांना नवे परिमाण दिले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीHowdy Modiहाऊडी मोदी