शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:19 IST

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अपघातात शेकडो प्रवाशांचा मृ्त्यू झाला आहे.

Ahmedabad Plane Crash: भारतासाठी आजचा दिवस (१२ जून २०२५) काळा दिवस ठरला. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान दुपारी उड्डाणानंतर कोसळले. या विमानात 230 प्रवाशांसह 12 क्रु मेंबर्स प्रवास करत होते. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या भीषण अपघातात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

जिवंत वाचण्याची शक्यता खूपच कमी: अहमदाबाद पोलिस आयुक्तमीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद पोलिस आयुक्त जी.एस. मलिक यांनी सांगितले की, अपघाताची तीव्रता पाहता कोणत्याही प्रवाशाची वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. विमान निवासी भागात कोसळल्याने, काही स्थानिक लोकांचाही मृत्यू झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्यामुळे, त्यांचा जीव वाचणे कठीण आहे.

या अपघातानंतर अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मर्यादित उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. सशस्त्र दलाच्या तुकड्या तातडीने मदत आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय, सुरुवातीच्या मदत कार्यासाठी सशस्त्र दलांसह एनडीआरएफ आणि इतर एजन्सी देखील घटनास्थळी पोहोचल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी बोलून तातडीने सर्व आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, अहमदाबादमध्ये सर्व संबंधित एजन्सींना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती

अपघात कसा झाला?एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी)च्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान एआय-171 ने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.17 वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी 23 वरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान मेघनगर आयजीपी कॉम्प्लेक्समध्ये विमान कोसळले. विमानातील इंधन टाकी पूर्ण भरलेल्या होत्या, त्यामुळे विमानाने तात्काळ पेट घेतला. अपघातावेळी विमानात 242 लोक होते. यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादairplaneविमानAccidentअपघातGujaratगुजरात