शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:16 IST

Air India Ahmedabad Plane Crash: अहमदाबादवरुन लंडनला जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Air India Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लंडनला जाणऱ्या विमानात 242 प्रवासी आणि क्रु मेंबर्स होते. हा अपघात इतका भीषण होता की, यात बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होतोय. विशेष म्हणजे, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील होते. 

दरम्यान, या अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके मदत आणि बचावासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच विमान रहिवासी भागात कोसळले. या अपघातामुळे या भागातील अनेक इमारती जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे विमानातील प्रवाशांसोबतच त्या भागातील लोकांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

अपघाताचे अपडेट्स...एआय171 क्रमांकाचे विमान अहमदाबादहून लंडनसाठी दुपारी 1.17 निघाले.दुपारी 1.20 वाजता मेघनानी नगर परिसरातील मेंटल हॉस्पिटल कॅम्पसजवळ विमान कोसळले.अपघातावेळी एअर इंडियाच्या विमानात 230 प्रवासी आण 12 क्रू मेंबर्स होते.अपघातामुळे या परिसराला सील करण्यात आले आहे.विमान उडवणारे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल होते, ज्यांना 8500 तासांचा अनुभव होता.तर, सह-वैमानिकाला 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता.

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची प्रतिक्रियाया अपघाताबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू म्हणाले की, अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला आणि प्रंड दुःख झाले. आम्ही सर्वजण अलर्ट आहोत. मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सर्व विमान वाहतूक आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत आणि घटनास्थळी वैद्यकीय मदत आणि मदत पोहोचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.

विमान अपघात प्रकरणी एअर इंडियाचे निवेदन आले आहे. एअर इंडियाने X वर पोस्ट शेअर केली आणि म्हटले की, अहमदाबाद-लंडन विमान AI171 आज, १२ जून २०२५ रोजी क्रॅश झाले. आम्ही सध्या अधिक माहिती मिळवत आहोत आणि शक्य तितक्या लवकर Air India.com वर शेअर करू."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मुख्यमंत्र्यांना फोन

विमान अपघाताच्या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी युद्धपातळीवर त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमी प्रवाशांना त्वरित उपचार मिळावेत अशीही त्यांनी सूचना केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात