शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Ahmedabad Metro: डायाफ्रामशिवाय टीबीएम लॉन्च, भारतात पहिल्यांदा मेट्रो प्रकल्पात वापरली पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 06:10 IST

टॉप-डाउन (top-down) बांधकाम पद्धतीमध्ये स्टेशन बॉक्स डी-वॉल हा टीबीएम टनेलिंगच्या आधी बांधला जातो. मात्र कांकरिया स्टेशनवर ते शक्य नव्हते. त्यामुळे ही नाविन्यपूर्ण पद्धती अवलंबली गेली.

अहमदाबाद - अहमदाबाद भुयारी मेट्रो प्रकल्पात (Ahmedabad Underground Metro Project)  डायाफ्राम वॉल (Diaphragm Wall) शिवाय टनेल बोरिंग मशीन्स (TBM) लाँच करण्यात आल्या आहेत. या मेट्रो प्रकल्पात देशात पहिल्यांदाच ही पद्धत वापरण्यात आली आहे. या पर्यायी पद्धतीमुळे कांकरिया मेट्रो स्टेशनच्या बांधकामासह उर्वरित प्रकल्पासाठी बोगद्याच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे. 

अहमदाबाद मेट्रोच्या भुयारी प्रकल्प -1 मध्ये दोन भूमिगत स्थानके, एकूण 3.5 किमी लांबीचे जुळे बोगदे, एक कट आणि कव्हर विभाग आणि उन्नत आणि भूमिगत विभागांना जोडणारा रॅम्प बांधण्याचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी करत आहे. कांकरिया स्टेशनसाठी जमीन हस्तांतरणास विलंब व इतर कारणांमुळे हेडवॉल (Headwall) बांधकाम ठप्प झाले होते. या कालावधीत कार्यान्वित होण्यासाठी तयार असलेले पहिले टीबीएम गतीने सुरू होऊ शकले नाही. प्रकल्पाचा विलंब कमी करण्यासाठी आणि कामाला गती देण्यासाठी, प्रकल्प टीमने कांकरिया स्टेशनवर डी-वॉलशिवाय टीबीएम टनेलिंग करण्याची नवीन पद्धत स्वीकारली.

टॉप-डाउन (top-down) बांधकाम पद्धतीमध्ये स्टेशन बॉक्स डी-वॉल हा टीबीएम टनेलिंगच्या आधी बांधला जातो. मात्र कांकरिया स्टेशनवर ते शक्य नव्हते. त्यामुळे ही नाविन्यपूर्ण पद्धती अवलंबली गेली. त्यामध्ये टीबीएमला सामावून घेण्यासाठी स्टेशनची रुंदी 20 मीटर वरून 22 मीटर करण्यात आली. या नवीन पद्धती विषयी माहिती देताना, प्रकल्प व्यवस्थापक एस नक्किरन म्हणाले की “पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे जाणार्‍या दोन्ही मार्गांसाठी बोगदे सुरू झाले होते. त्यामुळे टीबीएमचे काम लाँचिंग शाफ्टपासून सुरू करण्यात आले.  दोन्ही मार्गांचे बोगदे कायमस्वरूपी रिंग बांधून सुरळीत पूर्ण झाले आणि नंतर कालुपूर स्टेशनवर टीबीएम बाहेर काढण्यात आले. 

भारतात पहिल्यांदाच मेट्रो प्रकल्पात ही पद्धत वापरण्यात आली.  यापूर्वी इस्तंबूल मेट्रोमध्ये ही पद्धत अवलंबली गेली होती. टीबीएम (TBM) च्या व्यवस्थित कामाच्या खात्री करण्यासाठी टीमने अर्थ प्रेशर सेन्सर (earth pressure sensor) साठी इन-हाऊस कॅलिब्रेशन युनिट देखील विकसित केले. “कधीकधी, जेव्हा सेन्सर चिखलाने झाकळतो तेव्हा सेन्सर्सच्या अर्थ प्रेशरच्या कामामध्ये अडथळे येतात. त्यामुळे त्याचे कॅलिब्रेशन आवश्यक होते तथापि, प्रत्येक वेळी उत्पादकाकडून कॅलिब्रेशन करून घेणे, किंवा त्यासाठी युनिट भाड्याने देणे खर्चिक आणि वेळखाऊ होते. म्हणून या समस्येचे निराकरण करण्यासाठी टीमने एक कॅलिब्रेशन युनिट इन हाऊस विकसित केले नक्किरन म्हणाले.

कांकरिया स्थानकावरील कामाला गती देण्यासाठी अनुक्रम पद्धतीऐवजी समांतर बांधकाम पद्धतीचा अवलंब करण्यात आला.“आम्ही मुख्य स्टेशन बॉक्सचे बांधकाम नियोजित वेळेपेक्षा चार महिने अगोदर पूर्ण करू शकलो आणि ओव्हर ट्रॅक एक्झॉस्ट (OTE) डक्टची उभारणी निर्धारित वेळेच्या पाच महिने आधी झाली. गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन (Gujrat Metro Rail Corporation) ने ही या प्रयत्नांचेही कौतुक केलेआहे,” ते पुढे म्हणाले. 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अहमदाबादकरांना मेट्रो मिळणार?

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अहमदाबाद शहराला मेट्रो ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी अहमदाबादमध्ये मेट्रो ट्रेनच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. वस्त्राल-थलतेज आणि एपीएमसी-मोटेरा मार्ग पूर्ण झाले असून पंतप्रधान मोदी या मार्गावरील मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील असं सांगितले जात आहे. 

टॅग्स :Metroमेट्रो