वर्ल्ड हेरिटेज सिटी"चा दर्जा मिळवणारे अहमदाबाद पहिले भारतीय शहर
By Admin | Updated: July 9, 2017 18:13 IST2017-07-09T18:13:36+5:302017-07-09T18:13:36+5:30
युनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे.

वर्ल्ड हेरिटेज सिटी"चा दर्जा मिळवणारे अहमदाबाद पहिले भारतीय शहर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - युनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून हा समस्त देशवासियांसाठी आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. पोलॅण्डच्या क्रोकोव शहरात शनिवारी झालेल्या युनेस्कोच्या 41व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबादला जागतिक वारसा शहर घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावाला तुर्की, लेबनान, ट्युनिशिया, पेरू, कजाखस्तान, फिनलँड, झिम्बाब्वे आणि पोलंडसह 20 देशांनी पाठिंबा दिला.
अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे. अहमदाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची 26 सुरक्षित स्थळे आणि शेकडो खांब आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या आठवणींवर प्रकाश टाकणारी अनेक महत्वाची स्थळे या शहरात आहेत.