शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

'आजारी मुलाला जपानमधून भारतात आणण्यासाठी हवेत सव्वा कोटी, मदत करा'; हतबल पित्याचं मोदी-शहांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 11:46 IST

Father Letter To PM Narendra Modi Amit Shah For His Son : हरिभाई पटेल यांना आपल्या आजारी मुलाला भारतात परत घेऊन यायचे आहे. मात्र जयेशला परत आणण्यासाठी तब्बल सव्वा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

नवी दिल्ली - एका पित्याने आपल्या आजाऱ्या मुलासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्याकडे मदत मागितली आहे. आजारी मुलाला जपानमधून (Japan) भारतात (India) आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पित्याने मोदी आणि शहांना पत्र लिहून मदतीसाठी याचना केली आहे. हरिभाई पटेल (Haribhai Patel) असं या पित्याचं नाव असून त्यांचा मुलगा जयेश पटेलला (Jayesh Patel) भारतात आणण्यासाठी पत्र लिहिलं आहे. जयेशला सध्या जपानमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. 

हरिभाई पटेल यांना आपल्या आजारी मुलाला भारतात परत घेऊन यायचे आहे. मात्र जयेशला परत आणण्यासाठी तब्बल सव्वा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र एवढा खर्च करण्यासाठी कुटुंब सक्षम नाही. त्यासाठीच त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडे मदत मागितली आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील घाटलोडिया भागात शायना सिटी येथे हरिभाई पटेल राहतात. मात्र सध्या ते मुलाच्या देखभालीसाठी आपात्कालीन व्हिसावर जपानमध्ये राहत आहेत. त्यांचा मुलगा जयेश पटेल हा गेली अडीच वर्षे जपानमध्ये काम करत आहे. जयेशला पत्नी आणि दोन मुली असून,ते सर्वजण भारतात हरीभाई यांच्यासमवेत राहतात. 

जयेशची पत्नी जलपाने सहा महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे. अशा परिस्थितीत एकट्यानं परदेशात आपल्या मुलाची देखभाल करणं हरीभाई यांना खूप कठीण जात आहे. जयेशला क्षय रोग (TB) झाल्याने 5 ऑक्टोबर 2020 मध्ये शिबुकावा मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. जयेश त्यातून बरा होत असतानाच 7 जानेवारी रोजी त्याला ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आला आणि त्याची तब्ब्येत खूपच खालावली. त्याच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र इथल्या उपचारांचा खर्च अत्यंत महाग असल्याने हरीभाई यांना तो परवडणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या मुलाला भारतात परत नेऊन तिथे त्याच्यावर योग्य ते उपचार केले जावेत अशी त्यांची धडपड आहे. 

"आपल्या मुलाची संपूर्ण जबाबदारी घेण्यास आपण तयार असून, त्याला परत भारतात नेण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी मदत करावी" असं हरिभाई पटेल यांनी म्हटलं आहे. "माझा मुलगा क्षयरोगातून 80 टक्के बरा झाला होता पण आता तो मेंदूपर्यंत पसरल्याने त्याची तब्ब्येत खूपच खराब झाली आहे. त्यामुळे कुटुंबाला काळजी लागून राहिली आहे" अशी माहिती हरिभाई यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. तसेच खासदार हसमुख पटेल यांनाही पत्र लिहून मदतीचं आवाहन केलं आहे. हसमुख पटेल यांनी जपानमधील भारतीय दूतावासाला पत्र लिहून एअर इंडियाच्या विमानाद्वारे जयेश पटेल याला भारतात आणण्याची सोय करण्याबाबत सूचना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतJapanजपानNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाhospitalहॉस्पिटल