Corona Vaccination : कोरोना लस घेतल्यास 60 हजारांचा स्मार्टफोन जिंकण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 06:10 PM2021-12-01T18:10:48+5:302021-12-01T18:11:33+5:30

COVID-19 vaccination : अशा योजना फक्त गुजरातमध्येच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये लसीकरणाला चालना देण्यासाठी राबवल्या जात आहेत.

Ahmedabad civic body offers Rs 60,000 smartphone to lure people for COVID-19 vaccination | Corona Vaccination : कोरोना लस घेतल्यास 60 हजारांचा स्मार्टफोन जिंकण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर...

Corona Vaccination : कोरोना लस घेतल्यास 60 हजारांचा स्मार्टफोन जिंकण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर...

Next

अहमदाबाद : अहमदाबाद महानगरपालिकेने  (Ahmedabad Municipal Corporation) कोविड लसीकरण (Covid Vaccination) वाढवण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी लकी ड्रॉ कॉन्टेस्टची घोषणा केली आहे. या लकी ड्रॉमध्ये विजेत्याला 60,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन दिला जाईल. या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने अहमदाबाद महानगरपालिकेच्या हवाल्याने म्हटले आहे की, 1 ते 7 डिसेंबर दरम्यान कोरोना लसीचा दुसरा डोस घेणारे या कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. या कॉन्टेस्टमधील विजेता नंतर घोषित केला जाईल.

दरम्यान, अहमदाबाद महानगरपालिकेकडून लोकांना कोरोना लसीकरण लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अहमदाबाद महानगरपालिकेने कोरोना लसीचा लाभ घेतलेल्या नागरिकांना मोफत खाद्यतेल आणि लकी ड्रॉ यासारखे प्रोत्साहन जाहीर केले होते. लसीकरण कार्यक्रमाबाबत जागरुकता निर्माण करण्याबरोबरच 100% लोकांना लसीकरण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय,अहमदाबाद महानगरपालिकेने लकी ड्रॉच्या 25 विजेत्यांना ₹10,000 च्या अतिरिक्त भेटवस्तू देखील जाहीर केल्या होत्या.

अशा योजना फक्त गुजरातमध्येच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये लसीकरणाला चालना देण्यासाठी राबवल्या जात आहेत. याआधी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडने 'लसीकरण मेळावा' जाहीर केला होता आणि त्यावेळी लस घेतलेल्या लोकांना सांगितले होते की, ते लकी ड्रॉसाठी पात्र आहेत. ज्यामध्ये त्यांना इलेक्ट्रिक स्कूटी, साउंड सिस्टीमसह एलईडी टीव्ही आणि डबल डोअर रेफ्रिजरेटरशिवाय इतरही बक्षिसे जिंकू शकता. यासोबतच स्मार्टफोन, टॅबलेट, मायक्रोवेव्ह, किचन अप्लायन्सेस, फूड प्रोसेसर, ओव्हन, इंडक्शन, ट्रॅकसूट आणि शूज यासारखी बक्षिसेही जाहीर करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, 'ओमायक्रॉन' हा कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट समोर आल्याने गुजरात सरकारने राज्यातील आठ शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू 10 दिवसांसाठी वाढवला आहे. रात्रीचा कर्फ्यू आता 10 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, आठ शहरांमध्ये 1 नोव्हेंबरपासून उशिरा रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू आहे. दरम्यान, दिवाळी आणि छठ पूजा आणि कोविड-19 च्या घटनांमध्ये घट झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये कर्फ्यूची वेळ दोन तासांनी कमी करण्यात आली होती.

एका सरकारी अधिसूचनेनुसार, अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, जामनगर, भावनगर, गांधीनगर आणि जुनागड या शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू आणखी 10 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. या शहरांमधील दुकाने, सलून रात्री 12 वाजेपर्यंत उघडू शकतील तर रेस्टॉरंट्स मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु ते 75 टक्के क्षमतेने उघडे राहतील. त्याचबरोबर जेवणाची 'होम डिलिव्हरी' आणि पॅकिंगनंतर टेक अवे (टेकअवे) ही सेवाही मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.

Web Title: Ahmedabad civic body offers Rs 60,000 smartphone to lure people for COVID-19 vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.