शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:38 IST

Ahmedabad Plane Crash: विमानाचा अपघात कसा झाला याची चौकशी आता सुरु झाली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर सापडला आहे. त्यामध्ये या शेवटच्या काही सेकंदात विमानात काय झाले हे समजणार आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात तिन्ही पायलटनी आपले प्राण गमावले आहेत. विमानाने उड्डाण केले आणि पुढच्या ५९ सेकंदांत होत्याचे नव्हते झाले. पायलटकडे काय होतेय हे कळायच्या आतच काही करण्यासाठी केवळ एका मिनिटापेक्षाही कमी वेळ होता. पायलटला जर वेळ मिळाला असता तर कदाचित हा अपघात नाही पण तीव्रता तरी कमी करता आली असती. विमानाच्या तिन्ही पायलटकडे पुरेसा अनुभव होता. परंतू, त्यांना वेळच मिळाला नाही. 

विमानाचा अपघात कसा झाला याची चौकशी आता सुरु झाली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर सापडला आहे. त्यामध्ये या शेवटच्या काही सेकंदात विमानात काय झाले हे समजणार आहे. असे असले तरी विमानाच्या पायलटने काही चुकी केली का हे देखील तपासले जाणार आहे. परंतू,समोर आलेल्या माहितीनुसार विमानात जे कॅप्टन होते त्यांना विमान उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यांच्यासोबत असलेल्या पायलटकडे त्यांच्या वयानुसार पुरेसा अनुभव होता. 

कॅप्टन सुमित सबरवाल यांच्याकडे थोडाथोडका नाही 8,200 तास विमान उड्डाणाचा अनुभव होता. एअरबस ए३१०, बोईंग ७७७ आणि बी७८७ सारखी विमाने त्यांनी चालविली होती. सह-पायलट क्लाईव्ह कुंदर यांना १,१०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. व्यावसायिक विमान उडविण्यासाठी किमान १,५०० तासांचा अनुभव आवश्यक असतो. 

महत्वाचे म्हणजे सबरवाल येत्या काही महिन्यांतच निवृत्त होणार होते. त्यांनी आपल्या ८८ वर्षांच्या वडिलांना त्यांची काळजी घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. सबरवाल यांचे वडील एकटेच घरी राहतात. सबरवाल यांची बहीण दिल्लीत असते. तिला दोन मुले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच तिने अहमदाबादला न जाता मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. कारण वडील एकटेच होते आणि सुमित सबरवाल यांच्या लंडनला पोहोचण्याच्या फोनची वाट पाहत होते.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद