शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:13 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash :अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी  केवळ एकच प्रवासी बचावला आहे.

अहमदाबाद - अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी  केवळ एकच प्रवासी बचावला आहे.

मृतांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विमान दुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात घडली. यात शिकाऊ डॉक्टरांसह २४ जण देखील मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. अनेक इमारती, वाहनांना आग लागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

अहमदाबाद हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने सांगितले, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर या विमानातील वैमानिकाने ‘मेडे’ असा संदेश पाठविला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर किंवा काही संकटात सापडले असेल तर हा संदेश दिला जातो. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे एका स्थानिक नागरिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसून येते. या विमानातील २४२ जणांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. 

विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान - हे विमान अहमदाबाद जवळच्या मेघानीनगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वार्टर्सजवळ कोसळले. या दुर्घटनेत किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची पत्नी मृत्युमुखी पडली असून, ६० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे.   -दुपारचे जेवण सुरू असल्याने विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर हॉस्टेलमध्येच होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दिली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेली आग इतकी मोठी होती की, त्यामुळे एका पाच मजली इमारतही खाक झाली.  - भारतातील २०२० नंतरची ही दुसरी सर्वात मोठी विमान दुर्घटना आहे. पूर्वी कोझिकोड (केरळ) येथे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान ओल्या धावपट्टीवरून घसरून दोन तुकडे झाले होते. त्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ ऑक्टोबर १९८८ रोजी इंडियन एअर लाइन्सचे विमान अहमदाबाद विमानतळावर उतरतानाच कोसळले होते. त्यात १३० जणांचा मृत्यू झाला होता. 

ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करणारअहमदाबाद : गुरुवारी दुपारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या करण्यात येणार आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलने त्यांचे डीएनए नमुने गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे, असे आरोग्य खात्याचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितले.  

विमानात कोणत्या देशाचे  किती नागरिक?अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या विमानात १२ क्रू मेंबरसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि कॅनडाच्या एक नागरिक यांचा समावेश होता. हे विमान गुरुवारी सायंकाळी ६.२५ वाजता लंडनमध्ये लँड करणे अपेक्षित होते.   

मृतांच्या वारसांना टाटा समूह देणार १ कोटी रुपयेनवी दिल्ली : अहमदाबादेतील एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या परिवारास १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा टाटा समूहाने गुरुवारी केली. टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी  ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, प्रत्येक मृताच्या वारसास टाटा समूह १ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देईल. याशिवाय जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च समूह करेल. बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य केले जाईल.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरात