शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदानालाही हिंसेचे गालबोट, भाजपा, टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 09:56 IST

 मतदानाच्या सहाव्या टप्प्यादरम्यानही बंगालमधील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे.

कोलकाता -  तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होत असल्याने बंगालमधील लोकसभेच्या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान,  मतदानाच्या सहाव्या टप्प्यादरम्यानही बंगालमधील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका बूथ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. तसेच मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. बंगालमधील आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. मात्र मतदानापूर्वी येथे हिंसाचाराने डोके वर काढले आहे. बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. रामोन सिंह असे या मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हत्येचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, अन्य दोन भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला.दुसरीकडे मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याच्या मृतदेह सापडला आहे. सुधाकर मैती असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याशिवाय मिदनापूर येथे तृणमूल काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार कऱण्यात आला आहे. तसेच बेल्दा येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला.  दरम्यान, बंगालमधील माजी आयपीएस अधिकारी आणि घाटल लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार भारती घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. केशपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी गैरवर्तन केले, असा आरोप त्यांनी केला आहे.    

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाtmcठाणे महापालिका