शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"देशात विचारधारेचे युद्ध, 'भारत जोडो' vs 'भारत तोडो", राहुल गांधींची भाजपवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:01 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी आज देशातील विरोधी पक्षांची बैठक होत आहे.

पाटणा : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी आज देशातील विरोधी पक्षांची पाटण्यात बैठक होत आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येला एका सभेला संबोधित करताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजप म्हणजे फक्त २-३ लोकांना फायदा देणे असून आम्ही देशात प्रेम पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्यासाठी कॉंग्रेससह देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजुट दाखवली आहे. आज १५ विरोधी पक्ष एकत्र येत बिहारची राजधानी पाटणा येते बैठक घेत आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे.  दरम्यान, पाटण्यातील एका सभेत बोलताना राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. "आम्ही तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान जिंकू आणि तिथे भाजप कुठेच दिसणार नाही. आम्ही गरिबांच्या पाठीशी उभे आहोत म्हणूनच आम्ही विजय संपादन करू. कारण भाजप म्हणजे फक्त २-३ लोकांना फायदा देणे आहे. भाजप द्वेष, हिंसाचार आणि देश तोडण्याचे काम करत आहे. तर आम्ही प्रेम पसरवण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी काम करत आहोत. विरोधी पक्ष आज येथे आले आहेत आणि आम्ही एकत्रितपणे भाजपचा पराभव करू", असे राहुल गांधींनी सांगितले.

सत्ताधारी भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात विचारधारेचे युद्ध सुरू असून एका बाजूला काँग्रेस पक्षाची 'भारत जोडो' विचारधारा आहे तर दुसरीकडे आरएसएस आणि भाजपची 'भारत तोडो' ही विचारधारा आहे. काँग्रेस पक्षाचा डीएनए बिहारमध्ये आहे. 

विरोधी पक्षातील दिग्गजांची हजेरी दरम्यान, विरोधकांच्या बैठकीला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा यांसह इतरही काही नेत्यांची उपस्थिती असणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाBiharबिहारRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ