शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिश्चियन मिशेलची अंतरिम जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:07 IST

अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा; कोरोनामुळे सुटका करण्याची केली होती मागणी

नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात अटकेत असलेला मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेल याची अंतरिम जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. तो सध्या तिहार जेलमध्ये बंद असून, कोरोना व्हायरसचे संक्रमण होऊ नये यासाठी आपल्याला अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारी याचिका त्याने दाखल केली होती.न्या. संजय किशन कौल व न्या. बी. आर. गवई यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपी ख्रिश्चियन मिशेलच्या याचिकेवर सुनावणी केली. पीठाने आरोपीची याचिका फेटाळताना म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने गठित केलेल्या उच्चाधिकार समितीच्या निकषानुसार आरोपीला जामीन दिला जाऊ शकत नाही.मिशेलचे वकील अल्जो के. जोसेफ यांचे म्हणणे होते की, आरोपीचे वय व जेलमध्ये जास्त गर्दी असल्याच्या कारणाने त्याला कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याची सुटका करण्यात यावी.मिशेलने त्याचा अंतरिम जामीन फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या ७ एप्रिलच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील कारवाईबाबत जोसेफ यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस महामारीमुळे कैद्यांची सुटका केली जात आहे; परंतु उच्चाधिकार समितीने जाहीर केलेल्या निकषानुसार, भारतातील जेलमध्ये बंद असलेल्या विदेशी कैद्यांची सुटका केली जाऊ शकत नाही.उच्च न्यायालयाने आरोपाचा अर्ज फेटाळताना म्हटले होते की, आरोपीला जेलमध्येच एका वेगळ्या कोठडीत ठेवले आहे. त्यात इतर दोन कैदी आहेत. हे बॅरेक नसून यात अनेक कैदी ठेवलेले नाहीत. त्याच्यासोबत राहणारे दोन्ही कैदी कोरोनाने संक्रमित नाहीत. त्यामुळे ५९ वर्षीय मिशेलने आपल्या आरोग्याचा हवाला देऊन व न्यायालयात गर्दी असल्यामुळे जामीन देण्याची केलेली मागणी अयोग्य आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.२०१८ मध्ये मिशेलचे प्रत्यार्पणख्रिश्चियन मिशेलला दुबईहून प्रत्यार्पित करून २२ डिसेंबर २०१८ रोजी भारतात आणले होते. मागील वर्षी ५ जानेवारी रोजी त्याला ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. याच घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात मिशेल याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील तीन मध्यस्थांपैकी एक असून, त्याची ईडी व सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील इतर दोन मध्यस्थ गुईडो हस्चके व कार्लो गेरोसा हे आहेत.

टॅग्स :Agusta Westland Scamअगुस्ता वेस्टलँड घोटाळाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय