शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Microsoft च्या मदतीनं सरकार शेतीत आणणार नवं तंत्रज्ञान; शेतकऱ्यांचा खर्च कमी आणि उत्पन्न वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 15:43 IST

कृषी मंत्रालयानं मायक्रोसॉफ्टसोबत केला करार. खर्च कमी करणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा उद्देश.

ठळक मुद्देकृषी मंत्रालयानं मायक्रोसॉफ्टसोबत केला करार. खर्च कमी करणं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हा उद्देश.

शेतीला आधुनिक बनवण्यासाठी आणि त्यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कृषी मंत्रालयाने मायक्रोसॉफ्ट इंडियाबरोबर करार केलाय. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीची किंमत कमी करणं आणि शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव देणे हा या कराराचा हेतू आहे. करारानुसार मायक्रोसॉफ्ट इंडिया स्मार्ट व पद्धतशीर शेतीसाठी विशेष इंटरफेस विकसित करेल. ज्यात कापणीनंतरचे व्यवस्थापन आणि वितरण यांचा समावेश आहे. देशातील सहा राज्यांमधील (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश) १० जिल्ह्यांतील निवडलेल्या १०० खेड्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे.केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत कृषी मंत्रालय आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया यांनी हा करार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिजिटल शेतीची कल्पनाशक्ती आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. "२०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मोदींनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर बराच भर दिला आहे. जेणेकरून शेतकऱ्यांची योग्य सोय होईल आणि त्याच्यासाठी ते फायद्याचंही ठरेल. तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसंच नवी पिढीदेखील शेतीकडे आकर्षित होईल," असं तोमर म्हणाले. शेतकऱ्यांना थेट फायदा"सरकारच्या पारदर्शकतेच्या विचारसरणीनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) यासह इतर योजनांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे. मनरेगामध्येही असंच घडत आहे. मनरेगाचा सर्व डेटा सरकारकडे उपलब्ध आहे, ज्यामुळे मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जाते. आज मनरेगामधील जवळपास १२ कोटी लोक जॉब कार्ड धारक आहेत. त्यातील जवळपास ७ कोटी लोकं काम घेण्यासाठी येत असतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरIndiaभारत