गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यादरम्यान चर्चेच्या ९ फेऱ्या पार पडल्या परंतु त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही. आता १९ जानेवारी रोजी चर्चेची दहावी फेरी पार पडणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना कायदा रद्द करण्याऐवजी काय हवंय हे त्यांनी सांगावं, असं वक्तव्य कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं. शेतकरी संघटना काहीही मान्य करण्यास तयार नाहीत. केवळ कायदा रद्द केला जावा अशी त्यांची मागणी असल्याचंही ते म्हणाले."आम्ही शेतकऱ्यांना कायद्यांमधील तरतुदींवर चर्चा करण्याची विनंती केली. तसंच ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या सरकारसमोर मांडाव्या असंही सांगितलं," अशी माहिती तोमर यांनी दिली. एएनआय या वृत्तसंस्थेशी चर्चा करताना त्यांनी यावर भाष्य केलं. कायदे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांना अजून कोणते पर्याय हवे आहेत, ते त्यांनी सांगावं असंही त्यांनी नमूद केलं.
कायदा रद्द करण्याव्यतिरिक्त कोणता पर्याय हवा हे शेतकऱ्यांनी सांगावं, बैठकीपूर्वी कृषीमंत्र्यांचं वक्तव्य
By जयदीप दाभोळकर | Updated: January 17, 2021 15:46 IST
आतापर्यंत सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ९ वेळा झाली चर्चा
कायदा रद्द करण्याव्यतिरिक्त कोणता पर्याय हवा हे शेतकऱ्यांनी सांगावं, बैठकीपूर्वी कृषीमंत्र्यांचं वक्तव्य
ठळक मुद्देआतापर्यंत सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ९ वेळा झाली चर्चा शेतकरी कायदे रद्द करण्यावर ठाम, १९ जानेवारीला पुन्हा चर्चा