शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:08 IST

narendra singh tomar : शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

ठळक मुद्दे'जर हे कृषी कायदे लागू केले तर इतर लोक त्यांची जमीन ताब्यात घेतली, अशी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. '

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्या वर्षी झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्याच्या मुद्यावरून सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला केला.

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

"देशात सध्या उलटी गंगा वाहत आहे. शेतकरी संघटनांना दोन महिन्यांपर्यंत विचारण्यात आले की कायद्यात काय चूक आहे? मात्र शेतकरी नेते हे सांगू शकले नाहीत, की कायद्यात काय कमतरता आहे. शेतकरी संघटना केवळ कायदा रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल आहेत. आम्ही कर माफ केला तर आता राज्य सरकार कर आकारत आहे. जे कर आकारत आहेत, त्याच्या विरोधात आंदोलन व्हायला हवे. कायद्यात काय कमतरता आहेत, हे शेतकरी नेत्यांनी सांगावे?", असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. 

जर हे कृषी कायदे लागू केले तर इतर लोक त्यांची जमीन ताब्यात घेतली, अशी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. मात्र, या कृषी कायद्यात अशी कोणती तरतूद आहे की ज्यामुळे व्यापाऱ्यांना कोणत्याही शेतकर्‍याची जमीन घेता येईल, हे विरोधकांनी सांगावे, असेही नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. याशिवाय, पंजाब राज्याचा उल्लेख करत नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, "भारत सरकार कायद्यात कोणत्याही बदलासाठी तयार आहे, याचा अर्थ असा लावला जाऊ नये की कृषी कायद्यात काही चूक आहे. संपूर्ण एका राज्यात लोक गैरसमजाचे बळी ठरले आहेत. हा एकाच राज्याचा मुद्दा आहे."  

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा