शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture and Rural Budget 2019: अर्थसंकल्पात गावांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय खास?; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 15:24 IST

मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाकडे देशाचे डोळे लागले होते. अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी ग्रामीण भागावर विशेष जोर दिला. गेल्या पाच वर्षांत ग्रामीण भागांमध्ये राबवलेल्या योजना, त्यामुळे झालेला फायदा यावर सीतारामन यांनी भाष्य केलं. यानंतर त्यांनी ग्रामीण भागासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. - भारत खेड्यांमध्ये सामावलेला आहे, हा महात्मा गांधींचा विचार बोलून दाखवत आपल्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू गाव आणि शेतकरी असेल, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.  - 2024 पर्यंत गावांमधील प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यात येईल. जल जीवन मिशनच्या अंतर्गत हे काम करण्यात येईल, असं सीतारामन म्हणाल्या.- प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2019-20 ते 2021-22 पर्यंत 1.95 घरांची निर्मिती करण्यात येईल. त्यामध्ये स्वयंपाकाचा गॅस, वीज आणि शौचालय या सुविधा असतील. आधी एक बांधायला 314 दिवस लागायचे. आता 114 दिवस लागतात. - ग्राम सडक योजनेचं 97 टक्के लक्ष्य पूर्ण झालं आहे. येत्या वर्षभरात 1,25,00 किमीचे रस्ते बांधले जातील. त्यासाठी 80,250 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. हे रस्ते पर्यावरणपूरक असतील.- 2022 पर्यंत गावांमधील प्रत्येक कुटुंबाला वीज आणि एलपीजी गॅसची सुविधा दिली जाईल. - पुढील 5 वर्षांत 10 हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना तयार केल्या जातील.- प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाच्या अंतर्गत 2 कोटी गावं डिजिटल साक्षर झाली.  

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budget 2019अर्थसंकल्प 2019agricultureशेतीPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना