कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:19+5:302015-06-29T00:38:19+5:30
नागपुरात डाखळे यांची वर्णी : चलवदे पुण्याकडे रवाना

कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या
न गपुरात डाखळे यांची वर्णी : चलवदे पुण्याकडे रवाना नागपूर : राज्य शासनाने कृषी विभागातील १८ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी केले आहेत. यात नागपूर विभागातील तीन मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यानुसार नागपुरातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांची पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळावर प्रकल्प व्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली आहे. तसेच नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे यांना काटोल येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून पाठविण्यात आले असून, त्यांच्या जागी काटोल येथील उपविभागीय कृषी अधिकारी पंढरीनाथ नथ्थूजी डाखळे यांची वर्णी लागली आहे. याशिवाय कोल्हापूर येथील विभागीय कृषी सहसंचालक मकरंद कुलकर्णी यांची सांगली येथे बदली करण्यात आली असून, सांगली येथील सर्जेराव गोविंद फाळके यांची कोल्हापूर येथे, नाशिक येथील विभागीय कृषी सहसंचालक विश्वंभर भानुदास सरोदे यांची अहमदनगर येथे विभागीय बीज प्रमाणिकरण अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ......