शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

Farm Laws : कृषी कायद्यांना शरद पवारांचं समर्थन? नरेंद्र सिंह तोमर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 17:21 IST

शरद पवार गुरुवारी म्हणाले होते, शेतकरी 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. पण, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात डेडलॉक झाले आहे आणि ते अजूनही तेथेच बसून आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला हवी.

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते तथा NCP अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कृषी कायद्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. तोमर म्हणाले, "शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर बोलताना म्हटले आहे, की सर्वच कायदे बदलण्याची आवश्यकता नाही. ज्या मुद्द्यांवर आक्षेप असेल, त्यावर विचार करून ते बदलायला हवेत." कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यारून, शरद पवार कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य करत आहेत, असे दिसते. (Agri Minister Narendra Singh Tomar welcomes the stand of NCP chief Sharad Pawar on the farm laws) 

शरद पवार गुरुवारी म्हणाले होते, शेतकरी 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. पण, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात डेडलॉक झाले आहे आणि ते अजूनही तेथेच बसून आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला हवी." शरद पवार यांच्या या वक्तव्यावर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हणटले आहे, की आपण शरद पवारांच्या या भूमिकेचे स्वागत करतो आणि सरकारही कुठल्याही मुद्यावर चर्चेतून मार्ग निघायला हवा, यावर सहमत आहे, असे म्हटले आहे.

शरद पवारही UPA सरकारमध्ये कृषी मंत्री होते आणि सध्याच्या मोदी सरकारने जे कायदे आणले आहेत, अगदी तसेच कायदे आणण्याची त्यावेळच्या यूपीए सरकारचीही इच्छा होती. त्यावेळी काँग्रेसकडूनही अगदी याच पद्धतीचे कायदे तयार करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते. पण, गेल्या वर्षी मोदी सरकारने हे नवे कृषी कायदे आणल्यानंतर, मात्र विरोधकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली आहे.

सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे - शरद पवारपंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. आता चर्चा करायलाही तयार नाहीत. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी तेथे गोंधळ घातल्याचे ऐकले. सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असा सल्लाही शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmer strikeशेतकरी संप