शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवलिंगाच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाविरुद्ध याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 13:23 IST

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीतर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि शुक्रवारी सुनावणीसाठी याचिका पटलावर घेण्याचे मान्य केले.

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयानेवाराणसीच्याज्ञानवापी मशीद संकुलातील कथित शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या मुस्लीम पक्षकारांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सहमती दर्शवली. या सर्वेक्षणात शिवलिंग किती जुने आहे हे ठरवण्यासाठी ‘कार्बन डेटिंग’ तंत्राचाही समावेश आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीतर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि शुक्रवारी सुनावणीसाठी याचिका पटलावर घेण्याचे मान्य केले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले अपील प्रलंबित आहे, असे अहमदी म्हणाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ मे रोजी ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या वास्तूचे वय निश्चित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेश दिले होते, ज्यावर ‘शिवलिंग’ असल्याचा दावा केला जात आहे. 

मे २०२२ मध्ये ज्ञानवापी मशीद संकुलात केलेल्या सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या संरचनेच्या कार्बन डेटिंगसह वैज्ञानिक चाचण्यांची मागणी करणारी याचिका फेटाळून लावणारा वाराणसी कोर्टाचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला होता.

कायद्यानुसार कार्यवाही‘शिवलिंगा’चे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याच्या हिंदू पक्षाच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांना कायद्यानुसार कार्यवाही करून तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेश दिले होते. 

टॅग्स :VaranasiवाराणसीGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदCourtन्यायालय