शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! बायकोचा वाढदिवसच विसरला नवरा; नाराज झालेल्या 'तिने' केलं 'असं' काही की सर्वांनाच बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 10:31 IST

Husband not wished on birthday wife : वाढदिवसाच्या दिवशी विश केलं नाही म्हणून नाराज झालेल्या पत्नीला पतीने खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तिच्यासमोर हात जोडले. मात्र पत्नी काहीही ऐकून घेण्यास तयार नाही.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. आपल्या पत्नीला बर्थ डे विश न करणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. नाराज झालेल्या पत्नीने थेट पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. त्याच्यासोबतच नातं तोडण्याचाच निर्णय घेतला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. पत्नीने टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीय देखील हैराण झाले आहेत. 

वाढदिवसाच्या दिवशी विश केलं नाही म्हणून नाराज झालेल्या पत्नीला पतीने खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तिच्यासमोर हात जोडले. मात्र पत्नी काहीही ऐकून घेण्यास तयार नाही. तिने पतीसोबत एकत्र न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य आग्रा येथे राहणारं असून उच्चशिक्षित आहे. महिला पीएचडी करते आहे. तर तिचा नवरा कॉलेजमध्ये अकाऊंटट आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्या छोटेमोठे वाद होतंच होते. पण पत्नीच्या वाढदिवशी वाद विकोपालाच गेला आणि पतीने बर्थ डे विश केलं नाही म्हणून पत्नी खूप नाराज झाली. पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. 

नवऱ्याने हात जोडून माफी मागितली. नातं तोडू नको म्हणून  विनवणी केली. तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण बायकोने त्याचं काहीच ऐकलं नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. कौटुंबिक सल्ला केंद्रापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. तिथे पतीविरोधात तिने तक्रार केली. महिलेने तीन वर्षांतील सर्व तक्रारी सांगितल्या. नवरा कोणतंही काम आईवडिलांना विचारल्याशिवाय करत नाही. यावरून त्यांच्यात वाद होत होतेच. याच भांडणाला वैतागलेला पती पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरला. या दाम्पत्याचं समुपदेशन करण्यात आलं. अद्यापही या दाम्पत्यातील वाद मिटलेला नाही. त्यांना आता समुपदेशनासाठी दुसरी तारीख देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दिल्ली हादरलं! 9 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, जबरदस्तीने केले अंत्यसंस्कार; परिसरात खळबळ

दिल्लीमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती देऊ नका असं देखील तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. दिल्ली कंटोनमेंट परिसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश