शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Agniveer Female Bharti 2022: आता मुलीही होणार 'अग्निवीर', 40 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 12:43 IST

भारतीय नौदलात अग्निवीर भरतीमध्ये महिला उमेदवारांना 20 टक्के आरक्षण दिले जात आहे.

नवी दिल्ली : भारतीय नौदलात अग्निवीर भरतीमध्ये महिला उमेदवारांना 20 टक्के आरक्षण दिले जात आहे. आताच्या घडीला भारतीय नौदलात 550 महिला विविध पदांवर कार्यरत आहेत. मात्र आता महिला उमेदवारांना अग्निनीवर भरतीच्या माध्यमातून देखील रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. 

हे उमेदवार ठरतील पात्र 

  • - जी महिला उमेदवार अग्निवीर भरतीमध्ये भाग घेत आहे तिचे वय 17.5 वर्षे ते 21 वर्षे यादरम्यान असावे. 
  • - ती उमेदवार 10वी पास असून अविवाहित असणे गरजेचे आहे.
  • - उमेदवाराची उंची 152 इंच म्हणजेच 4 फूट 11 इंच असावी.

खरं तर या भरतीमध्ये मुलींना उंचीमध्ये काही प्रमाणात सूट देखील देण्यात आली आहे, ज्याची माहिची भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. 

निवड प्रक्रियाया भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल. 

कशावर आधारित असणार प्रश्न? या परीक्षेत ऑबजेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील. जे 30 मिनिटांत सोडवावे लागतील. यामध्ये गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान या संबंधित प्रश्न असतील, ज्याचा अभ्यासक्रम आणि नमुना पेपर भारतीय नौदलाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अशी होणार शारिरीक चाचणीलेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अग्निवीर मुलींना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल त्यांना 1.6 किलोमीटर धावणे 8 मिनिटांत पूर्ण करावे लागेल आणि 15 सिट-अप आणि 10 सिट-अप देखील करावे लागतील. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयएनएस चिल्का येथे होणाऱ्या वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर त्यांची अंतिम निवड केली जाईल. 

पगार आणि सुविधा भारतीय नौदलात नोकरी मिळाल्याच्या पहिल्या वर्षी महिला अग्निवीरांना दरमहा 30 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. यानंतर दुसऱ्या वर्षी दरमहा 40 हजार रुपये, तिसऱ्या वर्षी दरमहा 36 हजार 500 रुपये आणि चौथ्या वर्षी दरमहा 40 हजार रुपये दिले जातील. या भरतीशी संबंधित अधिक माहिती भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाjobनोकरीindian navyभारतीय नौदलWomenमहिला