शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही, राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला, शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:51 IST

Agniveer Controversy: राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री एक व्हिडीओ शेअर करत शहीद अग्निवीराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच या अग्निवीराच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. मात्र लष्कर आणि  संबंधित अग्निवीराच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपाचं बहुमत हुकल्याने आणि विरोधी पक्षातील काँग्रेससह इंडिया आघाडीच्या संख्याबळात लक्षणीय वाढ झाल्याने विरोधी पक्षांमधील नेते सध्या कमालीचे आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यातही विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी नव्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात केलेल्या भाषणामधून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी यांनी अनेक आरोप केले होते. मात्र हे आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री एक व्हिडीओ शेअर करत शहीद अग्निवीराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच या अग्निवीराच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. मात्र लष्कर आणि  संबंधित अग्निवीराच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अग्निवीर जवानांचा मुद्दा उपस्थित करताना लुधियाना येथील अजय कुमार याचा उल्लेख केला होता. अजय कुमार याचा जानेवारी महिन्यात जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे भूसुरुंगाच्या स्फोटात मृत्यू झाला होता. दरम्यान, लोकसभेत केलेल्या आपल्या दाव्याला खरं ठरवण्यासाठी बुधवारी रात्री या शहीद जवानाचा उल्लेख करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत आता लष्कराकडून स्पष्टिकरण देण्यात आलं आहे. तसेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना शहीद अजय कुमारच्या वडिलांनीही याबाबत माहिती दिली आहे. शहीद अग्निवीर अजय कुमार याचे वडील चरणजीत सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या खात्यात ९८ लाख रुपये जमा झाले आहेत. अजय कुमार याच्या मृत्यूनंतर ५० लाख रुपये मिळाले होते. तर १० जून रोजी ४८ लाख रुपये मिळाले, अशी माहिती त्यांनी झी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानंतर लष्कराकडूनही अजय कुमार याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. लष्कराने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं की, एकूण रकमेपैकी ९८.३९ लाख रुपये अग्निवीर अजय याच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहेत. अग्निवीर योजनेतील तरतुदींनुसार ६७ लाख रुपयांची मदत आणि इतर लाभ हे पोलीस व्हेरिफिकेशननंतर दिले जातील. त्यामुळे मदतीची एकूण रक्कम ही एक लाख ६५ कोटी एवढी होईल.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांनी केलेले अग्निपथ भरती योजनेसंदर्भातील दावे फेटाळून लावताना अग्निवीर योजना ही १५८ संघटनांकडून सल्ले घेतल्यानंतर सुरू करण्यात आल्याचे सांगितले. लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी अजय कुमार याच्या वडिलांच्या घेतलेल्या भेटीचा उल्लेख करत केंद्र सरकार त्याला शहिदाचा दर्जा दिला नाही. तसेच त्याच्या कुटुंबाला योग्य मोबदलाही दिला नाही, तसेच त्याच्या कुटुंबासाठी पेन्शनचीही कुठली व्यवस्था केलेली नाही, असा दावा केला होता. त्याला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी हे चुकीची विधानं करत सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार