शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:39 IST

Agneepath Scheme: सैन्यात 4 वर्षे सेवा दिलेल्या अग्निवीरांना रेल्वे विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची योजना आखली जात आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेविरोधात देशभरात गदारोळ सुरू आहे. सैन्यात 4 वर्षे सेवा दिलेल्या अग्निवीरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार विविध योजनांवर काम करत आहे. याअंतर्गत रेल्वे विभागात अग्निवीरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे. याबाबत आराखडा तयार असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंजुरी मिळणे बाकी आहे.

लष्करातील भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. केवळ चार वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर अग्निवीरांना हाकलून देणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यानंतर हे अग्निवीर बेरोजगार होतील आणि त्यांना कुठेही काम मिळणार नाही. याशिवाय लष्कराच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होणार आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, सरकारचे म्हणणे आहे की सैन्यातून आल्यानंतर स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आणि नवीन रोजगार देण्यासाठी सरकार संपूर्ण मदत करेल.

स्थानकांवर स्टॉल्स मिळतीलमीडिया रिपोर्टनुसार, रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, अग्निवीरांना रेल्वेमध्ये रोजगार देण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. अग्निवीरांना रोजगार देण्यासाठी “एक स्टेशन, एक उत्पादन” योजनेअंतर्गत स्टॉल्स दिले जातील. या योजनेअंतर्गत प्रत्येक शहरातील स्थानिक लोकप्रिय उत्पादनाची विक्री करण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर किमान दोन कायमस्वरूपी स्टॉल उघडले जातील. 

या उत्पादनांचा समावेशया स्टॉल्सच्या मदतीने ते त्यांचा स्वयंरोजगार सुरू करू शकतील आणि सैन्यातून आल्यानंतर त्यांना बेरोजगार राहावे लागणार नाही. तसेच, यामुळे प्रत्येक प्रदेशातील स्थानिक उत्पादनांचे ब्रँडिंग होईल, असा रेल्वेचा विश्वास आहे. हस्तकला, ​​कापड, हातमाग, पारंपारिक वस्त्रे, स्थानिक कृषी उत्पादने इत्यादींचा वन स्टेशन एक उत्पादन योजनेत समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Railwayभारतीय रेल्वे