शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Agneepath: अग्निपथ योजनेवर केंद्र सरकार ठाम, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये देशभर सुरू करणार भरती रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 06:50 IST

Agneepath Scheme: लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांच्या भरतीसाठी रविवारी व्यापक कार्यक्रम जाहीर केला. केंद्र सरकार या योजनेवर ठाम असल्याचे यावरून स्पष्ट झाले.

 नवी दिल्ली : लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांच्या भरतीसाठी रविवारी व्यापक कार्यक्रम जाहीर केला. केंद्र सरकार या योजनेवर ठाम असल्याचे यावरून स्पष्ट झाले. सैन्य विभागाचे अवर सचिव लेफ्टनंट जनरल ए. पुरी यांनी स्पष्ट केले की, ही योजना लागू करण्याच्या दिशेने सरकार पुढे पावले टाकत आहे. पुरी म्हणाले की, सशस्त्र दलांतील वय कमी करण्यावर दीर्घकाळापासून विचार सुरु होता. कारगिल समीक्षा समितीनेही यावर टिप्पणी केली होती. नौदलाच्या योजनेची माहिती देताना व्हाइस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, नौदल मुख्यालय २५ जूनपर्यंत भरतीसाठी दिशानिर्देश जारी करील. पहिली बॅच २१ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू करील. एअर मार्शल एस. के. झा म्हणाले की, नोंदणी २४ जून रोजी सुरू होईल. २४ जुलै रोजी ऑनलाइन परीक्षेला सुरुवात होईल. पहिल्या बॅचचे प्रशिक्षण ३० डिसेंबरपासून सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. ले. जनरल बन्सी पोनप्पा म्हणाले  की, सैन्याकडून सोमवारी अधिसूचना निघेल. भरती रॅली ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देशात होईल. ले. जनरल पोनप्पा यांनी सांगितले की, २५ हजार कर्मचाऱ्यांची पहिली बॅच डिसेंबरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात करील; दुसरी बॅच २३ फेब्रुवारीपासून सहभागी होईल. ४० हजार कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी ८३ भरती रॅली आयोजित करण्यात येतील. 

हिंसाचारात सहभागींना तिन्ही सेवांची दारे बंदnलेफ्टनंट जनरल ए. पुरी म्हणाले की, अग्निवीरांबाबत जे नवे निर्णय घेण्यात आले ते हिंसाचारानंतर घेतलेले निर्णय नाहीत. सरकार पूर्वीपासूनच त्यावर विचार करत होते. या हिंसाचारात जे तरुण सहभागी आहेत त्यांना सशस्त्र दलाच्या तिन्ही सेवांमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्यांना भरती प्रक्रियेत यायचे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यावे लागेल की, तेअशा कोणत्याही हिंसाचारात सहभागी नव्हते. nचार वर्षांनंतर ७५ टक्के अग्निवीर सशस्त्र दलातून बाहेर येतील. या मुद्यावर ले. जनरल पुरी म्हणाले की, सैन्याच्या तिन्ही दलातून दरवर्षी १,७६,००० सैनिक वेळेपूर्वीच सेवानिवृत्ती घेतात. असे नाही की, अग्निपथ योजनेअंतर्गतच लोक बाहेर पडतील. सैन्यात दरवर्षी ५० ते ६० हजार सैनिकांची भरती करण्यात येते. मात्र, कोरोनामुळे गत दोन वर्षात भरती झालेली नाही. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभाग