शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांची दुकानात लुटालूट; रेल्वे स्टेशनवरील VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 19:24 IST

Youth Looting Shops At Railway Station: "हे आपले भावी सैनिक (Soldiers) असूच शकत नाहीत."

केंद्र सरकारची अग्निपथ योजना (Agneepath Scheme) सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या योजनेविरोधात गेल्या चार दिवसांपासून लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अशातच ट्विटरवर एक व्हिडिओदेखील जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही आंदोलक दुकानातील सामानाची लूट करताना दिसत आहेत.

केवळ 45 सेकेंदांचा हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. "हे आपले भावी सैनिक (Soldiers) असूच शकत नाहीत.  बिहारमधील रेल्वे स्थानकावरील दुकानातील लुटीचा व्हिडिओ," असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.

दुकानांची लूट करताना दिसले लोक -ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक दुकानातून सामान लुटताना दिसत आहेत. खरे तर, अग्निपथ योजनेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणाहून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. यातच बिहारच्या आंदोलकांनी राज्य बंदची घोषणाही दिली होती. 

सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला देशातील अनेक राज्यांतून विरोध होत आहे. तरुणांमध्ये जबरदस्त आक्रोश दिसत आहे. बिहारनंतर आता राजस्थान, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणातही या योजनेचा विरोध वाढताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, अग्निपथ योजनेच्या माध्यमाने भर्ती केलेल्या एकूण जवानांपैकी 25 टक्के जवानांनाच सैन्यात नौकरी दिली जाणार आहे. यामुळेच विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

विरोधकही आक्रमक -एकीकडे सरकारच्या आपल्या या निर्णयाचे जोरदार कौतुक करताना दिसत आहे. तर विरोधक मात्र या मुद्द्यावरच मोर्चेबांधणी करण्याची तयारी करत आहेत. याच मुद्द्यावर काँग्रेस रविवारी सकाळी जंतरमंतरवर 'सत्याग्रह'ही करणार आहे.

टॅग्स :BiharबिहारSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसAgneepath Schemeअग्निपथ योजना