शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधक आक्रमक, महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:02 IST

Jagdeep Dhankhar Vs Jaya Bachchan In Rajya Sabha: सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये (Monsoon Session Of Parliament) राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. दरम्यान, सभापतींविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारीही राज्यसभेतील विरोधी पक्षांनी केल्याचं वृत्त आलं आहे.

सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. दरम्यान, आज खासदार जया बच्चन यांनी सभापतींनी केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधक आणि सभापती पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. तसेच सभापतींनी माफी मागावी, अशी मागणी जया बच्चन आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याबरोबरचा सभापतींविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारीही राज्यसभेतील विरोधी पक्षांनी केली असून, त्यासाठी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयात महाभिगोय प्रस्तावावर सदस्यांच्या सह्या घेतल्या जात आहेत.

जगदीप धनखड यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केल्याचं वृत्त एबीपी न्यूजसह काही हिंदी वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.  महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी १४ दिवसांची नोटिस द्यावी लागते. त्यादृष्टीने विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. महाभियोग प्रस्ताव दोन तृतियांश बहुमताने पारित झाला, तर सभापतींना पद सोडावं लागू शकतं. मात्र सध्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी एनडीएकडे बहुमत नसलं तरी बहुमताच्या जवळपास जाणारं संख्याबळ आहे. तसेच राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांमध्ये नसलेलेही अनेक पक्ष आणि खासदार आहेत. त्यामुळे आता या अविश्वास प्रस्तावाबाबत विरोधक पुढे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.   

दरम्यान, आजच्या राज्यसभेच्या कामकाजादरम्यान जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, "मी जया अमिताभ बच्चन, आज हे सांगू इच्छिते की मी एक कलाकार आहे, मला इतरांची देहबोली (बॉडी लँग्वेज) आणि चेहऱ्यावरील हावभाव समजतात. पण मला माफ करा सर, पण तुमचा बोलण्याचा टोन हा स्वीकारार्ह नाही. आपण सहकारी आहोत," असे जया बच्चन म्हणाल्या.

त्यानंतर सभापती जगदीप घनखड म्हणाले की, "जया जी, तुम्ही खूप नाव कमावलं आहे. सारे तुमचा आदर करतात. पण तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शकाला योग्य माहिती असते. तुम्ही काही गोष्टी तिथे बसून पाहू शकत नाही, ज्या मी या खुर्चीत बसून पाहू शकतो. दररोज मला हे पुन्हा असा प्रकार नकोय. मी येथे पाहून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. तुम्ही माझ्या टोन बाबत बोलताय... आता बास झालं... तुम्ही भले सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखं सारखं सहन करणार नाही."

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाJaya Bachchanजया बच्चनINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन