भारतमाध्ये पुन्हा ५.१ रिश्टर तीव्रतेचे जाणवले झटके
By Admin | Updated: April 27, 2015 18:47 IST2015-04-27T18:47:02+5:302015-04-27T18:47:02+5:30
बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल येथे सोमवारी संध्याकाळी पून्हा भूकंपाचे हादरे जाणवले असून त्यांची तीव्रता ५.१ रिश्टर इतकी नोंदवण्यात आली आहे.

भारतमाध्ये पुन्हा ५.१ रिश्टर तीव्रतेचे जाणवले झटके
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल येथे सोमवारी संध्याकाळी पून्हा भूकंपाचे हादरे जाणवले असून त्यांची तीव्रता ५.१ रिश्टर इतकी नोंदवण्यात आली आहे.
हे हादरे काठमांडू पासून २०० कि.मी अंतराववर जाणवले आहेत. तसेच दार्जिलिंग येथील मिरिक जवळ भुकंपाचे केंद्र असल्याचे USGS या संस्थेने सांगितले आहे. या हाद-यांमध्ये कोणतीही मानवहानी किंवा संपत्तीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आलेले नाही. नेपाळमध्ये भारतीय सैनिक व इतर संबंधित यंत्रणा अहोरात्र मदतकार्य करत आहेत. तसेच सोमवारी १६६ भारतीयांना मायदेशी सुखरुप परत आणण्यात आले असल्याचे नेपाळमधील भारतीय पराराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले.