शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

EVM वरून पुन्हा वाद, विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 19:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नवी दिल्ली -   लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर इव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षांच्या आज झालेल्या बैठकीमध्ये ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून  पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धावा घेण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. या बैठकीमध्ये सहा विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  दरम्यान, विरोधी पक्षांची ही बैठक म्हणजे निवडणूक संपण्यापूर्वीच पारभव पत्करल्याचे उदाहरण असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे.या बैठकीनंतर टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ईव्हीएममध्ये गोंधळ झाल्याचा आरोप करत शनिवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान चार हजारांहून अधिक इव्हीएम खराब झाल्या होत्या, असा आरोप नायडू यांनी केला.  ''आम्ही ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोता. जगाच्या पाठीवर ईव्हीएमचा वापर करणारे खूपच कमी देश आहेत. जर आम्हाला मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर मतपत्रिकेव्दारे मतदान घेतले पाहिजे,'' असे नायडू यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र निवडणूक आयोग याकडे पुरेसे लक्ष देत आहे, असे वाटत नाही.जर तुम्ही एक्स पार्टीला मत दिले तर मत वाय पार्टीला जात आहे. तसेच व्हीव्हीपॅट मशीनमधून येणारी चिठ्ठीसुद्धा 7 सेकंदांऐवजी तीन सेकंदच दिसत आहे,असा आरोप काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टीTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय