पुन्हा घातला ३१ हजारांचा ऑनलाईन गंडा
By Admin | Updated: January 8, 2016 02:13 IST2016-01-08T02:13:55+5:302016-01-08T02:13:55+5:30
औरंगाबाद : ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे रोज नवीन सावज शोधत असतात. एका टी. व्ही. वरील शोमध्ये बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून सिडको एन-४ येथील एका जणाला ३१ हजार २५० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. ही घटना ६ ते २२ डिसेंबर २०१५ या कालावधीत घडली.

पुन्हा घातला ३१ हजारांचा ऑनलाईन गंडा
औ ंगाबाद : ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे रोज नवीन सावज शोधत असतात. एका टी. व्ही. वरील शोमध्ये बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून सिडको एन-४ येथील एका जणाला ३१ हजार २५० रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. ही घटना ६ ते २२ डिसेंबर २०१५ या कालावधीत घडली.पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-४ येथील ज्ञानेश्वर काळे यांच्या मुलाला एका टी. व्ही. शोमध्ये बक्षीस लागल्याचा फोन एका आरोपीने केला. त्याच्यावर विश्वास ठेवून आरोपी गोविंद याने तुम्हाला हे बक्षीस प्राप्त करण्यासाठी शासनाचा कर म्हणून काही ठराविक रक्कम बँकेत भरावी लागेल असे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार काळे यांनी आरोपी गोविंद, आरोपी राजकुमार यांच्या खात्यावर वेगवेगळ्या वेळा असे एकूण ३१ हजार २५० रुपये भरले. याप्रसंगी एसबीआय बँकेचा व्यवस्थापक म्हणून त्यांच्याशी बोलणार्या आणखी एका आरोपीने या फसवणुकीत त्यांची मदत केल्याचे काळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मुकुंदवाडी पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.