अफजल गुरु नाही, रोहीत वेमुला माझा आदर्श - कन्हैय्या कुमार
By Admin | Updated: March 4, 2016 17:02 IST2016-03-04T16:59:08+5:302016-03-04T17:02:45+5:30
अफजल गुरु नाही तर रोहीत वेमुला माझा आदर्श आहे असं वक्तव्य जवाहरलाल नेहरु विद्यालय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने केलं आहे

अफजल गुरु नाही, रोहीत वेमुला माझा आदर्श - कन्हैय्या कुमार
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ४ - मला यावेळेला विचाराल तर अफजल गुरु नाही तर रोहीत वेमुला माझा आदर्श आहे असं वक्तव्य जवाहरलाल नेहरु विद्यालय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने केलं आहे. पत्रकार परिषदेदरम्यान रोहीत वेमुलाने प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला त्यावेळी तो बोलत होता. अफजल गुरु हा अखंड भारतातील काश्मीरचा नागरिक होता. अफजल गुरु घटनेनुसार भारतीय नागरिक, त्याला कायद्याने शिक्षा दिली आहे असंही कन्हैय्या कुमार बोलला आहे.
जेएनयूचे विद्यार्थी देशद्रोही नाहीत याची हमी मी देशवासियांना देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कोणताही वैयक्तिक मतभेद नाही आहे, वैचारिक मतभेद आहे, मनातला भेदही नाही आहे त्यामुळेच 'मन की बात' करत असल्यांचं कन्हैय्या कुमारने सांगितलं आहे. संविधानाचं उल्लंघन करणा-या गोष्टींच जेएनयू विद्यार्थी संघटनेने समर्थन केलेलं नाही आणि करणारही नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा आम्हाला समजते. 9 फेब्रुवारीला जेएनयूमध्ये जे झालं त्याचा आम्हीही निषेध करतो, देशद्रोह होता की नाही हे न्यायालय ठरवेल, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं कन्हैय्या कुमार बोलला आहे.
मी राजकारणी नाही, विद्यार्थी आहे, या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडलं आहे. जर कोणी एखाद्या देशात राहत असेल तर त्या देशाच्या विरोधात कोणत्याही कारवाईत तो कसा काय सहभागी होईल ? असा सवाल विचारत कन्हैय्या कुमारने आपण देशाविरोधात काहीही केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.