अफजल गुरु फाशी प्रकरण व्यवस्थित हाताळले गेले होते - आर के सिंग
By Admin | Updated: February 26, 2016 16:21 IST2016-02-26T16:21:27+5:302016-02-26T16:21:27+5:30
अफजल गुरु फाशी प्रकरण अत्यंत व्यवस्थित प्रकारे हाताळलं गेलं असं माजी गृहसचिव आणि भाजप नेते यांनी सांगितलं आहे

अफजल गुरु फाशी प्रकरण व्यवस्थित हाताळले गेले होते - आर के सिंग
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २६ - अफजल गुरु फाशी प्रकरण अत्यंत व्यवस्थित प्रकारे हाताळलं गेलं असं माजी गृहसचिव आणि भाजप नेते यांनी सांगितलं आहे. चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना आर के सिंग यांनी ही माहिती दिली आहे. चिदंबरम यांनी अफजल गुरु प्रकरण व्यवस्थित हाताळलं गेलं नव्हतं अस वक्तव्य केलं होतं.
अफजल गुरुच्या फाशीसंबंधी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनादेखील सर्व माहिती देण्यात आली होती असं आर के सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. पी चिदंबरम कदाचित पुस्तक लिहित असावेत त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं असाव अशी टिकादेखील केली आहे.