शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विराटचं 'चॅलेंज' स्वीकारणाऱ्या मोदींनी पेट्रोल स्वस्त करण्याचंही चॅलेंजही स्वीकारावं-राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 15:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांना एक चॅलेंज दिलं आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांना एक चॅलेंज दिलं आहे. सध्या देशभरातील नागरिक ज्या समस्येमुळे हैराण झाले आहेत, त्या इंधन दरवाढीसंदर्भात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चॅलेंज दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचे दर कमी करुन दाखवावेत, अन्यथा काँग्रेस देशभरात इंधन दरवाढीविरोधात आंदोलन उभारेल, अशा स्वरुपाचे चॅलेंज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले आहे. ट्विटरवर इंधन दरवाढीसंदर्भातील मुद्दा पोस्ट करत त्यांनी मोदींना चॅलेंज दिलं आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विट पोस्टला पंतप्रधान मोदी प्रत्युत्तर देणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. 

(पंतप्रधान नरेंद्र मोदी विराट कोहलीला म्हणाले, 'Challenge Accepted')

तर दुसरीकडे, सरकारने इंधन दर आवाक्यात आणले नाहीत, तर २० जुलैपासून देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक वाहतूकदारांच्या केंद्रीय संघटनेने दिली आहे. सोबतच वाहतूकदारांची राज्यव्यापी संघटना बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने बुधवारी बैठक घेत या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. बीजीटीएचे सचिव अनिल विजन म्हणाले, संघटनेच्या पदाधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मशीद बंदर येथे पार पडली. त्यात इंधन दरांमध्ये झालेली वाढ शासनाने कमी केली नाही, तर चक्काजाम आंदोलनात सामील होण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. याआधीच गाडीचे स्पेअर पार्ट आणि टायर अशा वस्तूंचा समावेश केंद्र सरकारने चैनीच्या वस्तूंमध्ये केल्याने वाहतूकदारांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. सध्या २८ टक्के जीएसटी आकारणा-या सरकारने १२ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची मागणी संघटनेने केली आहे. त्यात वाढत्या इंधन दरांमुळे वाहतूकदारांचे कंबरडे मोडल्याचे विजन म्हणाले. इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. ते २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याची माहिती भायखळा भाजी मार्केट प्रिमायसेस सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली. ते म्हणाले, इंधन दर कमी केले नाही, तर भाज्यांचे दर दुपटीने वाढतील. तूर्तास फरस बी, भेंडी, वांगी, फ्लॉवर या भाजीपाल्याचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोल